अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघं त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे, चित्रपटांमुळे जेवढे चर्चेत होते. त्यापेक्षा जास्त चर्चेत त्यांच्या पर्सनल लाइफमुळे, प्रेमप्रकरणामुळे होते. त्या दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आणि एक काळ असा होता, जेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. हम दिल दे चुके सनम पासून त्यांच्या नात्याला सुरूवात झाली आणि काही काळ ते एकत्र होते. त्याच्या लव्हस्टोरीची सर्वत्र चर्चा होती, ते खूप गाजलंही. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. थोड्याच दिवसांत अतिशय वाईट पद्धतीने त्यांच ब्रेकअप झालं, ज्याचीही सर्वत्र खूपच चर्चा झाली. सलमान ऐश्वर्याबद्दल बराच पझेसिव्ह होता. आजही चाहत्यांना त्यांच्या या आवडत्या जोडीची सतत आठवण येत असते.
दरम्यान सलमान ऐश्वर्या यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ऐश्वर्या गाणं गात्ये आणि सलमान खान सगळं जग विसरून एकटक तिच्याचकडे पहात आहे.
ऐश्वर्याकडे एकटक पहात होता सलमान
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सलमान हा त्याची (माजी) वहिनी मलायका अरोरा हिच्यासोबत प्रेक्षकांमध्ये बसलेला दिसतोय. तर स्टेजवर ऐश्वर्या कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. त्याचदरम्यान ती गाणं गाऊ लागते आणि सलमान तिच्याकडे पहातच राहतो. ‘मेरी आंखों में बसा है तेरा ही इक नाम’ हे गाणं ऐश्वर्या तिच्या सुरेल आवाजात गायला सुरूवात करते. गाणं म्हणताना ती अनेकदा लाजते आणि शेवटी म्हणते, मी खूप नर्व्हस आहे.
तर दुसरीकडे ऐश्वर्याला पाहून सलमानच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य मावळतंच नाहीये. तो तिला गाण गाताना पहात होता आणि हसत होता. मात्र काही सोशल मीडिया युजर्सच्या मते ऐश्वर्या रायचं हे गाणं आणि सलमानची ही रिॲक्शन हे दोन वेगवेगळे व्हिडीओ आहेत. मात्र त्याबद्दल काही अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.
काश.. ते एकत्र आले असते तर…
ऐश्वर्या-सलमानचा हा व्हिडीओ जुना असता तरी सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालाय आणि त्यावर चाहत्यांनी कॉमेंट्सचा पाऊस पाडलाय. ‘ काश..हे दोघे एकत्र आले असते तर’ अशी कमेंट एकाने लिहीली तर ‘सलमानचं ऐश्वर्याशी लग्न व्हायला हवं होतं ‘अशी इच्छा एकाने व्यक्त केली होती. तर तिसऱ्या युजरने लिहीलं ‘ दोघेही खूप क्यूट दिसत आहेत’.
सध्याचं सांगायचं झालं तर आता ऐश्वर्या आणि सलमान दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. सलमानशी नात तुटल्यानंतर ऐश्वर्याने विवेक ओबेरॉयला डेट केलं पण नंतर त्यांचही ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि ती जया व अमिताभ बच्चन यांची सून बनली. ऐश्वर्या आणि अभिषेकला आराध्या बच्चन ही मुलगी आहे. ऐश्वर्याने गेल्या काही काळापासून अभिनयापासू दूर आहे. ती मुलीच्या संगोपनावर अधिक लक्ष देत आहे. सलमानबद्दल बोलायचे झालं तर तो अजूनही सिंगल. ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यावर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं, पण त्यांचं नातं फार पुढे गेलं नाही. तो असूनही अविवाहीतच असून सध्या त्याच्या कामात व्यस्त आहे. दरवर्षी त्याचे 1-2 चित्रपट झळकत असतात.