महाराष्ट्राला लाभलेल्या त्या चिमुकल्याचा दमदार आवाज, अजय-अतुलच्या संगीतदावर निनादणार

| Updated on: Sep 26, 2022 | 9:13 PM

जयेश खरेचा आवाज पोहचला आता अजय अतूल पर्यंत पोहचला आहे. ग्रामीण भागातील जयेश खरेचे भाग्य चंद्रा गाण्यामुळे उजळले आहे.

महाराष्ट्राला लाभलेल्या त्या चिमुकल्याचा दमदार आवाज, अजय-अतुलच्या संगीतदावर निनादणार
Follow us on

अहमदनगर : चंद्रा गाण्यामुळे सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालेल्या अहमदनगरच्या जयेश खरे(Jayesh Khare) याचे नशीब फळफळलं आहे. पोराचा आवाजच इतका भारी आहे की अजय-अतुल(Ajay Atul ) पण शोधत आले आहेत. अजय-अतूलने जयेशला थेट चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. यामुळे शाळेच्या वर्गात गाणाऱ्या जयेशचा आवाज थेट चित्रपटातून घुमणार आहे.

जयेश खरे हा मूळचा राहुरी तालुक्यातील वांजुळपोई गावचा रहिवासी. आपल्या आईवडिलांसह तो राहतो. इयत्ता सहावीच्या वर्गात तो शिकत आहे. जिल्हा परिषद शाळेचा हा विद्यार्थी आहे.

हे सुद्धा वाचा

कृष्णा राठोड या शिक्षकाने त्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर कृष्णा राठोड इयत्ता सहावीच्या वर्गावर गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करताना त्यांनी जयेशचे टॅलेंट हेरले.

एखाद्या प्रख्यात गायका प्रमाणे जयेशने चंद्रा हे गाण गायले. जयेशचे टॅलेंट पाहून सरांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. अनेकांनी कमेंट् करत जयेशच्या टॅलेंटचे कौतुक केले. तसेच त्याला भविष्यात योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळावे अशी मागणी देखील केली होती.

जयेश खरेचा आवाज पोहचला आता अजय अतूल पर्यंत पोहचला आहे. ग्रामीण भागातील जयेश खरेचे भाग्य चंद्रा गाण्यामुळे उजळले आहे.

अजय – अतूल यांनी जयेशला मोठा ब्रेक दिला आहे. आगामी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी त्यांनी जयेशकडून गाणं गावून घेतले आहे.

अजय – अतूल यांनी  इंस्टाग्राम अकाऊंट याचा व्हिडीओ शेअर केला. जयेश खरेला थेट अजय अतूलचं आमंत्रण मिळ्याने चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

 

अभिनेता अंकुश चौधरीने जयेशचा व्हिडिओ शेअर केला आहे. अस्सल मातीतला कलाकार viral video ने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो… महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं… इतिहास असाच लिहिला जातो. महाराष्ट्र शाहीर… २३ एप्रिल २०२३… असं कॅप्शन अंकुशने या पोस्टला दिले आहे.