अजय देवगणने त्याच्या प्रॅंक करण्याच्या सवयीमुळे नेहमी चर्चेत असतो. आता त्याने सांगितलेला एक किस्सा फारच व्हायरल झाला आहे. एका शोमध्ये अजय देवगणने दारू पिण्याची अशी अनोखी पद्धत सांगितली, जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
रसगुल्ल्यामध्ये दारू मिसळून प्यायची निंजा टेकनीक काय?
2024 मध्ये अजय देवगणने त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून धुमाकूळ घातला आहे. सध्या अजय देवगनचा ‘आझाद’ चित्रपट येत असून तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा पुतण्या अमन देवगण या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 14 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अजय देवगण त्याच्या पुतण्याला कुकिंग शोमध्ये घेऊन गेला होता. या शोमध्ये अजयने तो रसगुल्ल्यामध्ये दारू कशी मिसळून प्यायचा याचा किस्सा सांगितला आहे.
अजय रसगुल्ल्यात मिसळून दारू का प्यायचा?
एका पॉडकास्टमध्ये अजय देवगणच्या पुतण्याला पहिल्यांदा विचारण्यात आले की, त्याने कधी विचित्र फूड कॉम्बिनेशन ट्राय केले आहे का? यावर अमनने सांगितले की तो डाएट कोकमध्ये फ्रेंच फ्राईज बुडवून खातो.
यावर अजय देवगण म्हणाला की, त्याच्याकडे असे काही किस्से नाही. पण त्याने पुढे सांगितले की तो जेव्हा चित्रपटांमध्ये रात्रंदिवस तो जेव्हा काम करत असे तेव्हा त्याने पिण्याच्याबाबतीत काही विचित्र गोष्टी करून पाहिल्या होत्या.
वयाच्या 15 वर्षांचा असल्यापासून अजय दारू पितोय
यादरम्यान अजय देवगणने सांगितले की तो वयाच्या 15 वर्षांचा असल्यापासून दारू पित आहे. पुढे चित्रपटांच्या शूटींगवेळी वैगरे प्रवासादरम्यान गाडीत बसून त्याला प्यायला वेळ मिळाला नाही, तेव्हा लाँग ड्राईव्हसाठी तो कुठे चालला असेल तेव्हा तो रसगुल्ला घेऊन पिळून घ्यायचा म्हणजे त्यातीस पाक सर्व निघून जाईल.
त्यानंतर रसगुल्ल्याचा आकार बदलताच तो पाण्यात टाकून धुवून घ्यायचा. यानंतर, ते रसगुल्ले पिळून पुन्हा त्यातील गोड पाणी काढून टाकायचा. शेवटी तो ते रसगुल्ले दारुमध्ये टाकायचा आणि नंतर खायचा.
काही लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्यात तर काहींनी ट्रोल
अजय देवगणचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे लोक त्याला ट्रोल करत आहेत. काही काळापूर्वी अजय देवगणने एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, तो वयाच्या 15 व्या वर्षापासून दारू पीत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने म्हटलं आहे की “आता तुम्ही हे देखील प्रसिद्ध करा”. काही लोकांनी लिहिले की “अजय सरांची अशी स्टाईल मी कधीच पाहिली नाही, हे पाहून बरे वाटले” , तर, एका यूजरने लिहिले, “व्वा, मला एक नवीन कल्पना सापडली आहे, आता मला ती करून पहावी लागेल” अशा पद्धतीने काहींनी ट्रोल केलं तर काहींनी गंमतीत घेत कमेंटस् केल्या आहेत.