Akash Ambani-Shloka Daughter : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या घरी अलीकडेच एका छोट्या परीचे आगमन झाले. अंबानी कुटुंबातील मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि सून श्लोका अंबानी (Shloka Ambani) यांना कन्यारत्न झाले आहे. अंबानी कुटुंबियांनी एका छानशा मेसेजद्वारे तिचे नाव सांगितले आहे. फॅन पेजवर हे कार्ड शेअर केले जिथे पृथ्वी अंबानीने त्याच्या बहिणीचे नाव जाहीर केले आहे.
आकाश अंबानी आणि श्लोका यांनी त्यांच्या मुलीचे नाव वेदा आकाश अंबानी ठेवले आहे.अंबानी कुटुंबाच्या वतीने कार्ड शेअर करताना मुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ही पोस्ट खूप लाईक केली आहे.
फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या या कार्डमध्ये धीरूभाई अंबानी आणि कोकिला अंबानी यांचेही नाव आहे. भगवान कृष्णाचा आशीर्वाद घेऊन पृथ्वीने आपली धाकटी बहीण वेद आकाश अंबानीचा जन्म आणि नाव जाहीर केल्याचे कार्डमध्ये लिहिले आहे. अंबानी कुटुंब आणि मेहता कुटुंबातील सदस्यांची नावेही कार्डवर लिहिली आहेत.
31 मे रोजी श्लोका मेहता अंबानी यांनी मुलीला जन्म दिला. आकाश अंबानीचे हे दुसरे अपत्य आहे. श्लोका आणि आकाश अंबानी यांना, पृथ्वी आकाश अंबानी, हा 2 वर्षांचा मुलगा आहे. अलीकडेच मुकेश अंबानींच्या मांडीवर बसलेल्या पृथ्वीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अंबानी कुटुंब दर्शनासाठी मंदिरात पोहोचले होते.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह मार्च 2019 मध्ये झाला होता. अंबानी कुटुंबीयांच्या लग्नात बॉलिवूडपासून बिझनेसपर्यंतचे बडे सेलिब्रिटी सामील झाले होते. अंबानी कुटुंबाच्या फंक्शनमध्ये शाहरुख खानपासून ते बच्चन कुटुंबापर्यंत सगळेच नाचताना दिसले. अलीकडेच मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिनेही जुळ्या मुलांना जन्म दिला असून ती मुलांसह भारतात परतली तेव्हाचे फोटोही खूप व्हायरल झाले होते.