विवाहित अभिनेत्याशी प्रेम, लग्नाआधीच गरोदर अन् नंतर गर्भपाताचा आरोप; अखेर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडले मौन

| Updated on: Dec 12, 2024 | 5:19 PM

 सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर एका अभिनेत्याच्या पत्नीने गंभीर आरोप लावले आहेत. तिच्या आरोपांवरून ही अभिनेत्री  लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल होती अन् कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने गर्भपातही केला आहे. अखेर या सर्व आरोपांवर अभिनेत्रीने स्वत:च सर्व खुलासा केला आहे. 

विवाहित अभिनेत्याशी प्रेम, लग्नाआधीच गरोदर अन् नंतर गर्भपाताचा आरोप; अखेर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडले मौन
Follow us on

भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंगचे चाहते प्रचंड आहेत. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ते म्हणजे लग्नाआधी गरोदर राहिली होती या बातमीमुळे. अक्षराने तिच्या मेहनतीने आणि कामामुळे लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण लग्नाआधीच प्रेग्नंट राहण्याच्या बातमीमुळे ती चर्चेत आली आहे.

प्रेग्नेंसीवर अभिनेत्रीने अखेर मौन सोडलं 

अक्षरा सिंगचे भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप ॲक्टर पवन सिंगसोबत अफेअर होते. दोघांची जोडी सुपरहिट चित्रपटांमध्येही पाहायला मिळाली होती. अफेअरपेक्षा पवन सिंग आणि अक्षरा सिंगचे ब्रेकअप जास्त चर्चेत राहिले. ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर पवन सिंहची पत्नी ज्योती सिंहने अक्षरा सिंहबाबत धक्कादायक खुलासा केला होता. अक्षरा सिंग गरोदर असून तिचा गर्भपात झाल्याचे ज्योती सिंहने सांगितले होते. या आरोपांवर आता अक्षरा सिंह उघडपणेच बोलली आहे.

पवन सिंगच्या पत्नीचे आरोप खोटे असल्याचा अक्षराचा दावा 

ज्योती सिंहने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अक्षरा सिंह म्हणाली की, “माझ्यावर असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत. आता या आरोपांवर मला माझे मौन सोडावे लागेल. जेव्हा ज्योतीने पवन सिंहसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता आणि जेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज केला होता, तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि कोर्टात या गोष्टींचा खुलासा करण्यास सांगितले. मला ज्योतीची वेदना आणि अवस्था काय असू शकते हे समजत होतं.’ अशी प्रतिक्रिया अक्षराने दिली…मात्र त्यांच्यातील संभाषणाची रेकॉर्डिंग लीक झाल्याचेही म्हटले जाते आणि त्यानंतर म्हणजे 2018 नंतर अक्षरा सिंहने देखील या आरोपांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.

अक्षरा सिंहने ज्योतीने केलेले आरोप फेटाळून लावले. ती म्हणाले की, गर्भधारणा आणि गर्भपाताच्या आरोपात काहीही तथ्य नाही. अक्षरा सिंहने ज्योतीला असे कधीच सांगितले नव्हते. अक्षरा सिंह पुढे म्हणाली, ‘माझ्या वडिलांनाही याबाबत विचारण्यात आले होते. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे होते. मी आत्महत्या करावी अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. यापेक्षा वाईट काय असू शकते? असं सांगत अक्षराच्या प्रेग्नेंसीबाबतच्या सगळ्या बातम्या म्हणजे त्या केवळ अफवा असल्याचे अक्षराने सांगितले.

अक्षरा पवन सिंगच्या पत्नीवर कायदेशीर कारवाई करणार?

‘मी माझे काम करत आहे. मी कामासाठी प्रवास करत आहे. म्हणूनच मला या सगळ्याची पर्वा नाही. त्याचवेळी ज्योती सिंह यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रश्नावर अक्षरा म्हणाली – माझ्यासमोर कोणी माणूस असता तर मी नक्कीच बोलले असते. पण इथे एक स्त्रीचा प्रश्न आहे. ती महिला आधीच अडचणींशी झुंजत आहे, जेणेकरून तिला कुठूनतरी मदत मिळावी. मला त्याच्याबद्दल सहानुभूती आहे, पण सार्वजनिक व्यासपीठावर असे बोलणे लज्जास्पद आहे.” असं म्हणत अक्षराने या सर्व गोष्टींकडे दूर्लक्ष करण्याचं ठरवलं आहे.