Sooryavanshi | अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला मोठं ग्रहण! प्रेक्षकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार?

| Updated on: Mar 04, 2021 | 11:43 AM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाची अर्थात ‘सूर्यवंशी’ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता.

Sooryavanshi | अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला मोठं ग्रहण! प्रेक्षकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार?
सूर्यवंशी
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाची अर्थात ‘सूर्यवंशी’ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर, हा चित्रपट अद्याप प्रदर्शनाची तारीख मिळवण्यात अपयशी ठरला आहे. काही दिवसांपूर्वी ‘सूर्यवंशी’ चित्रपट 2 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. परंतु, अद्याप या चित्रपटाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘सूर्यवंशी’ बाबत कुठलीही घोषणा अद्याप का झाली नाही, याचे कारण आता समोर आले आहे (Akshay Kumar upcoming film sooryavanshi release date still on hold).

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार कोरोना प्रकरण आटोक्यात आल्यानंतर आणि सरकारने शंभर टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर ‘सूर्यवंशी’ 2 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण अद्याप चित्रपटाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबईतील कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या.

अहवालानुसार, कोरोना प्रकरणे महाराष्ट्रात सातत्याने वाढत आहेत आणि यामुळे राज्य सरकार नाईट कर्फ्यूसारखे काही निर्बंध पुन्हा लादू शकते. याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर होऊ शकतो. विशेषत: संध्याकाळी शोला याचा मोठा फटका बसू शकतो.

ट्रेड सोर्सप्रमाणे काही दिवस या परिस्थितीचे पुनरावलोकन केले जाईल. ‘लवकरच कोरोना केसेस कमी होऊ लागतील’, असा विश्वास सूर्यवंशीच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. असे झाल्यास महाराष्ट्र सरकार कोणतेही निर्बंध लादणार नाही आणि प्रदर्शनाचा मार्ग देखील मोकळा होईल. मात्र, तो पर्यंत प्रेक्षकांना मोठी वाट पहावी लागणार आहे.

बहुचर्चित ‘83’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ हे दोन्ही चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत बनले आहेत. रणवीर सिंगच्या ‘83’ या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट 4 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. या चित्रपटात 1983च्या विश्वचषकातील क्षण पुन्हा जागवले जाणार आहेत. तसेच या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पदुकोणसुद्धा दिसणार आहे (Akshay Kumar upcoming film sooryavanshi release date still on hold).

खिलाडी कुमारच्या ‘बेल बॉटम’ची रिलीज डेटही निश्चित!

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ 28 मार्च रोजी रिलीज होत आहे. तथापि, अक्षयच्या चित्रपटाची स्पर्धा विन डिझेल आणि ड्वेन जॉन्सनच्या ‘फास्ट अँड फ्युरियस 9: द फास्ट सागा’ या चित्रपटाशी असणार आहे. तर, 28 मार्च रोजी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या 2 मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. या स्पर्धेत कोणता चित्रपट बाजी मारेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण, दोन्ही चित्रपटांबद्दल बरीच चर्चा रंगली आहे.

‘फास्ट अँड फ्यूरियस’ हा चित्रपट देखील मागील वर्षी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोव्हिडमुळे हा चित्रपट पुढे ढकलला गेला आणि आता हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, अक्षयचे 2 चित्रपट यावर्षी स्पर्धेत असणार आहेत. ‘सूर्यवंशी’ शिवाय अक्षयचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपटही शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटासह दिवाळीच्या काळात बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार आहे.

(Akshay Kumar upcoming film sooryavanshi release date still on hold)

हेही वाचा :

Dance Deewane | ‘हंसता हुआ नूरानी चेहरा’ तब्बल 47 वर्षांनी कॅमेरासमोर, कोण आहेत अभिनेत्री ‘जीवनकला केळकर’?

Rakhi Sawant Cheating Case | राखी सावंतसह भावावरही FIR दाखल, वाचा काय आहे ‘हे’ प्रकरण?