मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांच्या घोषणा सुरू झाल्या आहेत. एकापाठोपाठ एक मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी सुरक्षित तारीख निवडण्यासाठी स्पर्धा करत आहेत. पण कोरोनामुळे खूप चित्रपटांचे रिलीज रखडले आहे. त्यामुळे त्यांच्या तारखा क्लॅश होणारच. काही वेळापूर्वीच अक्षय कुमार (Akshay kumar) आणि आमीर खानच्या (Aamir Khan) चित्रपटांच्या क्लॅशची बातमी समोर आली आहे. शाहिद कपूरच्या (Shahid kapoor) ‘जर्सी’ ची नवीन रिलीज डेट 14 एप्रिल 2022 अशी निश्चित करण्यात आली आहे, ज्या दिवशी ‘KGF Chapter 2’ हा सर्वात मोठा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या काही दिवसांनंतर आमिर खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट क्लॅश होण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आमिरने 11 ऑगस्ट 2022 रोजी त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्याच दिवशी अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ देखील प्रदर्शित होणार आहे. हा या वर्षातील सर्वात मोठा क्लॅश मानला जात आहे. अक्षय कुमार हा सध्या बॉक्स ऑफिसचा बादशाह मानला जात असला तरी आमिरचा चित्रपट आला की सगळे रेकॉर्ड मोडीत निघतात. त्यामुळे ही टक्कर जोरदार होणार आहे.
तरुण आदर्श यांचे ट्विट काय?
AKSHAY VS AAMIR: THE BIG CLASH IS ON… With #AamirKhan shifting #LSC to 11 Aug 2022, there’s talk that it will be a solo release… NOT TRUE… #RakshaBandhan – starring #AkshayKumar – is already CONFIRMED for 11 Aug 2022… NO CHANGE in date… It’s #Akshay vs #Aamir now. pic.twitter.com/gri5DTXDS3
— taran adarsh (@taran_adarsh) February 15, 2022
प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे की, अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपटही आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’सोबत रिलीज होणार आहे. ‘रक्षा बंधन’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा कोणताही विचार केलेला नाही. असेही सांगण्यात आले आहे. तरुण आदर्श यांनी म्हटले आहे की, आमिरचा चित्रपट कोणाबरोबर क्लॅश करत नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण जसजशी समीकरणे तयार होत आहेत, तसतसा हा चित्रपट इतर कोणत्या चित्रपटासोबत क्लॅश न करण्याची शक्यता कमी झाली आहे.
क्लॅश झाल्यास दोन्ही चित्रपटांना फटका
आज आमिर खानने त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचा सेट हलवण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती दिली. एक नोट शेअर करत त्याने टी-सीरीज, ओम राऊत आणि ‘आदिपुरुष’च्या संपूर्ण टीमचे आभार मानले. कारण त्याच तारखेला प्रभास आणि सैफचा चित्रपट येणार होता. आमिरसाठी त्यांनी तारीख पुढे ढकलली. आता प्रकरण अक्षय कुमार विरुद्ध आमिर खान असे झाले आहे. दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांची गणिते जुळतात की नाही हे पुढे पाहावे लागेल. एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट आल्याने दोन्ही चित्रपटांना नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. याआधीही अनेक बड्या सिनेमांचा क्लॅश झाला आहे आणि दोन्ही चित्रपट यशस्वीही झाले आहेत. मात्र असे क्वचितच घडते. मात्र आता कोरोनाने एवढ्या चित्रपटांची रांग लावली आहे की, काहींच्या तारखा ठरवूनही बदलू शकत नाही.
हृतिक रोशन-सबा आझादच्या अफेअरची चर्चा, सबाचा फोटो शेअर करत हृतिकची पूर्वपत्नी सुझैन खान म्हणाली…
कोणती साडी घ्यावी हे कळत नाही?, अंकिता लोखंडेचं ‘हे’ साडी कलेक्शन बघा, तुमचं कन्फ्युजन दूर होईल…
पांढरी साडी त्यावर साजेशी गोल टिकली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाचा ‘गंगूबाई’ लूक, पाहा टॉप 5 फोटो