मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia bhatt) देखील फॅशन जगतातील सर्वात मोठ्या इव्हेंट मेट गाला 2023 (Met Gala 2023) मध्ये पदार्पण केले, ज्यामुळे ती सर्वत्र चर्चेत आहे. मोत्यांनी जडवलेल्या पांढऱ्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर आलेली आलिया अतिशय सुंदर दिसत होती. न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित मेट गाला 2023 मध्ये आलियाने नेपाळी-अमेरिकन फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अलीकडेच आलियाने इन्स्टाग्रामवर (instagram) इव्हेंटपूर्वीचा तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो चर्चेत आहे.
या व्हिडिओमध्ये आलियाने मेट गालासाठी तयार होत असताना तिची स्थिती कशी होती हे सांगितले आहे. आलियाच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमापूर्वी ती खूप नर्व्हस होती. हा व्हिडिओ आलियाने शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर दीपिका पदुकोणसह अनेक सेलिब्रिटींनी आणि युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हो, दीपिकानेही आलियाच्या पोस्टवर एक कमेंट केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मेट गालासाठी आलियाने परिधान केलेला पोशाख एक लाखांहून अधिक मोत्यांनी जडलेला होता, त्यात सिंगल फिंगरलेस ग्लोब्स जोडलेले होते, जे दिवंगत फॅशन डिझायनर लेगरफेल्डची आवडती ॲक्सेसरी होते. यावेळी त्यांच्या स्मरणार्थ मेट गालाची थीम ठेवण्यात आली होती. ‘ या आंतरराष्ट्रीय इव्हेंटसाठी मी खूप उत्सुक आहे’ असे आलियाने या व्हिडीओमध्ये नमूद केले आहे.
या आलियाने व्हिडीओमध्ये तिची अस्वस्थताही व्यक्त केली आहे. अशा स्थितीत दीपिकाने तिच्या पोस्टवर कमेंट करत आलियाला प्रोत्साहन दिले. You Did It ! असे दीपिकाने लिहीले असून त्यासोबत एक हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. दीपिकाच्या या कमेंटची आता युजर्समध्ये चर्चा होत आहे. यापूर्वी दीपिकाने ऑस्कर 2023 मधील काही छायाचित्रे शेअर केली होती, ज्यासाठी तिला ट्रोल करण्यात आले होते. अनेकांनी सांगितले की, आलियामुळे ती मेट गालामध्ये सहभागी होऊ शकली नाही.
कामाबद्दल सांगायचे झाले तर आलिया भट्ट आता करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासह रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्येही दिसणार आहे, त्या चित्रपटात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा दिसणार आहेत. आलियाही तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.