रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही बरेच चर्चेत असतात. त्यात आता रणबीर आणि आलियाची लेक राहादेखील आता पापाराझींची लाडकी बनली आहे. तिचे व्हिडीओ देखील नेहमीच व्हायरल होत असतात. दरम्यान रणबीर आणि आलियासुद्धा पापाराझींची लाडकी जोडी आहे.
रणबीर कपूरचा बिघडलेला मूड
पण बऱ्याचदा आलियापेक्षाही रणबीर कपूर हा पापाराझींवर चिडताना किंवा फोटो काढण्यासाठी नकार देताना दिसतो. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरला पाहून त्याचा मूड बिघडला असावा असंच दिसत आहे. कारण तो पापाराझीवरही चिडताना दिसला आणि रागात त्याने त्याचा हात पकडून त्याला बाजूलाही सारले.
कारमध्ये बसल्यावर आलिया रडत होती?
व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीरसोबत आलियासुद्धा दिसत आहे. आधी आलिया कारमध्ये बसते त्यानंतर रणबीर कारमध्ये बसायला जातो. मात्र कार बसत असताना आलिया खूप भावूक झालेली दिसत आहे. काहींनी ती रडत असल्याच्याही कमेंट केल्या.
तसेच जेव्हा ही जोडी कारमध्ये बसायला जात असते तेव्हा त्यांच्या कारजवळ खूप गर्दी पाहायला मिळत आहे. जेव्हा दोघेही कारमध्ये बसणार होते तेव्हा रणबीर कपूर पापाराझीवर चिडलेला दिसत आहे तसेच यादरम्यान तो एका व्यक्तीचा हात पकडून त्याला ओढतो आणि म्हणतो, “इकडे ये रे”.
नेटकरी काय म्हणाले?
दरम्यान रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ जुना असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, आणि अनेक नेटकरी यावर कमेंटस् करतानाही दिसत आहे. काही लोकांना रणबीर कपूरची ही कृती अजिबात आवडली नाही.
एका यूजरने लिहिले आहे की, “कॅमेरावाल्यांच्या हातात असतं तर त्यांनी सेलिब्रिटींच्या तोंडात कॅमेरा घातला असता”, अजून एका युजरने आलियासाठी लिहिलं आहे “अरे माझी क्यूटी रडू लागली आहे का?”
तर काहींनी रणबीरला सपोर्ट केला आहे. अनेकांनी रणबीरने जे केलं ते योग्य असून एवढही एखाद्याच्या खासगी आयुष्यात का डोकवायचं असतं असा प्रश्न विचारत पापाराझींनी ट्रोलही केलं आहे.