हिरोईन होण्यासाठी शाळा सोडली,लग्नाआधीच प्रेग्नंट,मोठ्या घराण्यात लग्न अन् आज 4, 600 कोटींची मालकीण

| Updated on: Mar 02, 2025 | 12:08 PM

अशी एक अभिनेत्री आहे जी सध्या बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. शिवाय सर्वाधिक मानधन आकारणारी म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं. पण आश्चर्याची बाब म्हणजे अभिनयासाठी या अभिनेत्रीने चक्क शिक्षण सोडून दिलं होतं. अन् आज 4,600 कोटींची मालकीण आहे.  

हिरोईन होण्यासाठी शाळा सोडली,लग्नाआधीच प्रेग्नंट,मोठ्या घराण्यात लग्न अन् आज 4, 600 कोटींची मालकीण
Follow us on

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे आज टॉपचे सेलिब्रिटी आहेत. पण त्यापैंकी बरेचजण असे आहेत ज्यांनी त्यांचे शिक्षणही पूर्ण केलेलं नाही किंवा फार मर्यादित शिक्षण घेतलं आहे. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जी आज इंडस्ट्रीमध्ये टॉपची अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये तिचं असं एक वेगळं स्थान आहे. पण तुम्हाला गे जाणून आश्चर्य वाटेल की या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आपलं शिक्षण अर्धवटच सोडलं.

अभिनयासाठी शिक्षण सोडलं

ही अभिनेत्री आहे आलिया भट्ट, आलिया भट्टने तिचे शालेय शिक्षणही पूर्ण केले नाही. तिने 12वी पर्यंतही शिक्षण घेतलेलं नाही. ती आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आलिया भट्ट – दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टने करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात आलियाच्या अभिनयाचे लोक फॅन झाले. तिने अभिनयाच्या जोरावर सर्वांचीच मनं जिंकली आहेत.


आलियाला शिक्षणात काहीच रस नव्हता 

आलिया ही मुळातच फिल्मी पार्श्वभूमीतून आली आहे, तिची आई नायिका आहे आणि वडील चित्रपट निर्माते आहेत. तिची बहीण देखील एक नायिका राहिली आहे. त्यामुळे तिलाही अभिनय क्षेत्रातच आपलं करिअर घडवण्याची इच्छा होती. त्यादिशेनेच तिने प्रयत्न केले. त्यामुळेच तिला शिक्षणात कोणताही रस नव्हता.

आलिया चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील तेवढीच चर्चेत राहिली आहे. कारण आलिया लग्नाआधीच गर्भवती राहिली होती. तिने रणबीर कपूरसोबत लग्न केलं आणि त्यांना राहा नावाची एक गोंडस मुलगी देखील आहे.

आलिया जवळपास 4,600 कोटींची मालकीण 

कारण आलिया भट्टचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. महागडे घरं आणि अपार्टमेंटची आलिया भट्ट मालकीण आहे. तसेच अनेक व्यवसायांमध्येही तिने गुंतवणूक केलेली आहे. तसेच बॉलिवूडमील सर्वात जास्त मानधन घेणार अभिनत्री म्हटलं जात. आलिया जवळपास 4,600 कोटींची मालकीण आहे. दरम्यान फक्त आलिया भटप्रमाणेच असे अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत ज्यांनी त्यांचे शिक्षणही पूर्ण केलेले नाही पण आज ते बॉलिवूडवर राज करत आहेत.