तेलगु सुपरस्टार अल्लु अर्जून याच्या पुष्पा – 2 चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे. हा चित्रपट 18 दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाही वाटले नव्हते हा चित्रपट इतकी कमाई करेल. या चित्रपटाने जो रेकॉर्ड केला आहे तो आजपर्यंत कोणत्याही भारतीय भाषिक चित्रपटाने केलेला नाही. 5 डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने रविवारी 22 डिसेंबर रोजी नवा इतिहास रचला आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या साल 2021 च्या ‘पुष्पा द राईज’ चा दुसरा भाग ‘पुष्पा – 2 द रुल’ या चित्रपटाने अठराव्या दिवशी देशातील आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या बाहुबली – 2 चा रेकॉर्ड तोडला आहे. ‘बाहुबली – 2’ चा रेकॉर्ड तोडल्यानंतर आता ‘पुष्पा – 2’ किती कमाई केली आहे ते पाहा…
पुष्पा 2 ने 4 डिसेंबर रोजी प्रीमियरला 10.65 कोटीची कमाई केली होती. त्यानंतर दर दिवसाला कमाईचा नवा विक्रमच केलेला आहे. दुपारी 3.25 पर्यंतच्या आकडेवारीनुसार अठराव्या दिवशी पुष्पा-2 ने 1043.95 कोटींची कमाई केलेली आहे.
पुष्पा -2 ने सतराव्या दिवसापर्यंत 1029.9 कोटीची कमाई केली आहे. भारतातील सर्वाधिक तिकीट कलेक्शन जमा करणाऱ्या टॉप -10 चित्रपटांच्या यादीत अभिनेता प्रभास याची बाहुबली – 2 ने 1030.42 कोटीची कमाई करुन पहिला नंबर पटकवला होता.आता हा रेकॉर्ड तोडण्यासाठी पुष्पा – 2 केवळ 52 लाख कमवायचे होते. आज हा आकडा पार करीत पुष्पा-2 ने सर्वाधिक कमाईचा बाहुबली-2 चा रेकॉर्ड तोडला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुष्पा -2 ही भारताची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे. आतापर्यंतचे तिकीटबारी वरील कलेक्शन पाहाता पुष्पा – 2 आणखी मोठा विक्रम करेल असे म्हटले जात आहे.
भारताचा पहिला चित्रपट 1913 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर कोणत्याही चित्रपटाने कमाईचा हा जादूई आकडा गाठलेला नाही. पुष्पा-2 या चित्रपटाच्या शेवटी पुष्पा – 3 शी संबंधित हिंट दिलेल्या आहेत. म्हणजेच अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल पुन्हा एकदा बॉक्स ऑफीसवर तहलका माजवणार आहेत हे स्पष्ट झालेले आहे. असे असले तरी पुष्पा – 3 च्या निर्मिती संबंधी कोणतीही अधिकृत अनाऊन्समेंट झालेली नाही.