सलमान-ऋतिकच्या हिरोईनला डेट करतोय आमिर; गर्लफ्रेंडसोबत होळी खेळल्याचे फोटो व्हायरल

| Updated on: Mar 16, 2025 | 9:56 AM

आमिर आणि त्याची गर्लफ्रेंड सध्या फार चर्चेत आहे. त्यांचे होळी सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच या जास्त चर्चा होतेय ती त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, कारण आहे सलमान आणि ऋतिक रोशन.  

सलमान-ऋतिकच्या हिरोईनला डेट करतोय आमिर; गर्लफ्रेंडसोबत होळी खेळल्याचे फोटो व्हायरल
Amir Ali Holi Celebration with Girlfriend Ankita Kukreti Goes Viral
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच होळीचा आनंद घेतला. सर्वांनीच होळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. अनेक सेलिब्रिटींच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता एका टीव्ही अभिनेत्याचीही तेवढीच चर्चा होताना दिसत आहे. याचं कारण आहे त्याची गर्लफ्रेंड. हा अभिनेता आमिर अली. तो त्याच्या कामामुळे तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचा त्याची पत्नी तथा अभिनेत्री संजीदा शेख हिच्याशी घटस्फोट झाला आहे. आमिर अली आणि संजीदा शेख यांना एक मुलगीही आहे.मात्र आता तो त्याची कथित गर्लफ्रेंडमुळे पुन्हा एकदा चर्चेचा भाग ठरत आहे. होळीच्या निमित्ताने, आमिर त्याच्या नवीन मैत्रिणीसोबत दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमिर अलीने त्याच्या नवीन नात्याची पुष्टी केली.

काही महिन्यांपूर्वीच आमिर अलीने त्याच्या नवीन नात्याची पुष्टी केली. त्याने स्वतः कबूल केलं आहे की तो पुन्हा कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहे. आमिर मॉडेल आणि अभिनेत्री अंकिता कुक्रेतीला डेट करतोय. अंकिता आणि आमिरचे होळी साजरी करतानाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आमिर त्याची प्रेयसी अंकिताची काळजी घेताना दिसत आहे. तसेच एकमेकांसोबत होळी एन्जॉय करताना दिसत आहे.

आमिर त्याच्या प्रेयसीची काळजी घेताना दिसला

व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर आणि अंकिता यांच्यातील प्रेम स्पष्टपणे दिसून येते. दोघेही एकमेकांसोबत खूप एन्जॉय करत आहेत. 43 वर्षीय आमिर म्हणतो की अंकिताने त्याला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवण्यास शिकवलं आहे आणि तो सध्या त्याच्या जागत आनंदी आहे. घटस्फोटानंतर अनेक वर्षे अभिनेता पूर्णपणे एकटा होता. त्याने स्वतःला खूप वेळ दिला. पण जेव्हा अंकिता कुक्रेती त्याच्या आयुष्यात आली तेव्हा त्याला पुन्हा प्रेम मिळालं असं त्याने म्हटलं आहे.

सलमान आणि हृतिकसोबत काम केले आहे

अंकिता कुक्रेतीने सलमान खान आणि हृतिक रोशनसोबतही काम केले आहे. सलमान आणि हृतिक पहिल्यांदाच एका जाहिरातीसाठी एकत्र आले. त्या दोघांची ही जाहिरात खूप चर्चेत राहिली आणि अ‍ॅक्शनने भरलेली होती. या जाहिरातीत अंकिता कुक्रेती देखील दिसली. जी हृतिकच्या शेजारी उभा असल्याची दिसत आहे. अंकिताचे अनेक म्युझिक व्हिडिओ आणि जाहिराती प्रदर्शित झाल्या आहेत. तिने सोनू सूदसोबत एका जाहिरातीतही काम केलं आहे.