आयरा व्हिडीओमध्ये म्हणाली, ‘माझ नाव इरा नाही आयरा आहे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, मला तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव इरा नाही तर आयरा आहे. आय म्हणजे डोळे आण रा.. आयरा. तुम्ही सगळेच माझं नाव चुकीचं उच्चार करता त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. माध्यातही माझं नाव इरा म्हणून संबोधलं जातं. पण ते आयरा आहे.’
एवढंच नाही तर आता आयरा डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांसाठीसुद्धा पुढे सरसावली आहे.
आयराने आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा काही दिवसांपूर्वी केला होता. तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला होता.
अलीकडे आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझादराव खान याचा वाढदिवस होता.
या खास प्रसंगी आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा धाकटा भाऊ आजाद राव खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून आयरा खान चर्चेत आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खान नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे .
जगभरातील चाहते इराच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.
मानसिक आरोग्याशी संबंधित इराची ही पायरी एक छोटीशी सुरुवात असू शकते, परंतु हे निश्चितपणे एखाद्यासाठी फायदेशीर ठरेल. लॉकडाऊनपासून, देशात मानसिक समस्यांना सामोरे जाणाऱ्यांमध्ये लक्षणीय संख्येनं लोक समोर आले आहेत. काही लोक त्यांच्या समस्या उघडपणे सांगत आहेत, तरीही बरेच लोक त्या गोष्टी शेअर करण्यास घाबरतात.