अमिताभ बच्चन हे इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत, ते जितके त्याच्या कामासाठी ओळखला जातात, तितकेच त्यांच्या खासगी आयुष्यासाठी चर्चेत असतात. अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan)सद्या त्यांच्या क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) मुळे चर्चेत आहेत. केबीसीच्या नुकत्याच झालेल्या भाग बिग बींसाठी खूप खास होता. आया भागात सहभागी झालेल्या खेळाडूने त्यांना त्यांची नात आराध्याशी (Granddaughter Aaradhya)संबंधित एक विशेष प्रश्न विचारला.
केबीसी सीझन 14 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांना 20 वर्षीय वैष्णवी कुमारी त्यांच्यासमोर हॉट सीटवर दिसली. पण, हा एपिसोड खास बनण्याचे
कारण बिग बींचे प्रश्न नसून वैष्णवीचे प्रश्न होते. , हॉट सीटवर बसताच वैष्णवीने अमिताभ विचारण्याआधीच त्यांना प्रश्न केला. त्यावर अमिताभ यांनीही मजेशीर उत्तर दिले.
वैष्णवीने अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला की, तुम्ही तुमची नात आराध्या बच्चनसोबत किती वेळ घालवता? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, आराध्यासोबत जास्त वेळ घालवू शकत नाही, पण त्याबदल्यात त्याची भरपाई खूप गोंडस पद्धतीने करतात.
पुढे बिग बी म्हणाले की मी सकाळी 7-7:30 वाजता कामावर निघतो, त्यामुळे मी आराध्याला कमी वेळ देऊ शकतो. त्याचवेळी आराध्या आठच्या सुमारास तिच्या शाळेत जाते. त्यानंतर ती 3-4 वाजता घरी येते आणि तिचा गृहपाठ करते. मग तिची आई काही काम सांगते, ती करते. मी घरी पोहोचतो तेव्हा 10-11 वाजलेले असतात. तोपर्यंत तिला झोप येते.
मात्र जेव्हा आराध्य रागावते तेव्हा तिचे आजोबा अमिताभ बच्चन तिच्यासोबत खेळतात. आराध्यासोबतचे नातं शेअर करताना अमिताभ बच्चन म्हणाले की, जेव्हा त्यांची नात रविवारी मोकळी असते आणि जेव्हा तिला सुट्टी असते, तेव्हा तो तिच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात .
जेव्हा ती त्याच्यावर रागावते तेव्हा तिला खुश करण्यासाठी चॉकलेट देतात . याशिवाय एका लेडीज हेडबँडकडे लक्ष वेधताना बिग बी म्हणाले की गुलाबी हा आराध्याचा आवडता रंग आहे. म्हणून तो तिला गुलाबी रंगाचा हेडबँड आणि क्लिप देतात . त्यामुळे तिचा राग लगेच शांत होतो.