अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाचा ‘सिलसिला’ सुरूच, प्रेमकथेने घेतला वेगळा रंग

| Updated on: Jul 05, 2024 | 10:21 PM

'सिलसिला' नंतर अमिताभ आणि रेखा या जोडीने पुन्हा कोणताही चित्रपट एकत्र केला नाही. 'सिलसिला'ने या लोकप्रिय जोडीचा अंत केला. शिवाय त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अफवांनाही पूर्णविराम दिला. मात्र, आता पुन्हा एकदा अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमाच्या 'सिलसिला'ची चर्चा सुरु झाली आहे.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाचा सिलसिला सुरूच, प्रेमकथेने घेतला वेगळा रंग
SILSILA AMITABH, JAYA BACCHAN, REKHA
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेका यांचा मल्टीस्टारर चित्रपट 1981 साली रिलीज झाला. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात संजीव कुमार आणि शशी कपूर यांच्याही भूमिका आहेत. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटात अमिताभ, जया, रेखा यांच्या कथित वास्तविक जीवनातील प्रेम त्रिकोणाची कथा यात होती. ‘सिलसिला’ नंतर अमिताभ आणि रेखा या जोडीने पुन्हा कोणताही चित्रपट एकत्र केला नाही. त्यामुळे त्यांचा हा शेवटचा चित्रपट होता. ‘सिलसिला’ने या लोकप्रिय जोडीचा अंत केला शिवाय त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अफवांनाही पूर्णविराम दिला. मात्र, आता पुन्हा एकदा अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमाच्या ‘सिलसिला’ची चर्चा सुरु झाली आहे. या प्रेमकथेने आता वेगळा रंग घेतला आहे.

अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमाचा ‘सिलसिला’ आता टीव्हीवर मालिकेच्या स्वरुपात दिसणार आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता संदीप सिकंद यांनी या नव्या टीव्ही सिरीअलची तयारी सुरु केली आहे. मात्र, यामध्ये काही नवीन कथा जोडली जाणार आहे. ही कथा कलाकारांभोवती फिरणारी असेल. अमिताभ आणि रेखा यांच्या भूमिका साकारण्यासाठी त्यांनी दोन कलाकारांची निवडही केली आहे.

निर्माता संदीप सिकंद यांनी अमिताभ आणि रेखा यांच्या भूमिकेसाठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची निवड केली आहे. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत हे दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. याच शोच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. सध्या हे जोडपे मुलगा रुहान याच्यासोबत आपला वेळ घालवत आहेत.

‘ससुराल सिमर का’ या टीव्ही मालिकेनंतर दीपिका कक्कर लोकप्रिय झाली. निर्माता संदीप सिकंद यांच्या ‘कहां हम कहाँ तुम में’ मध्ये दीपिका कक्करने काम केले आहे. यात करण ग्रोव्हर मुख्य भूमिकेत होता. 2019 मध्ये दीपिका कक्कर हिने ‘कहां हम कहाँ तुम’ या मालिकेत अखेरची भूमिका केली होती.

दुसरीकडे शोएब इब्राहिम याने ‘रेहना है तेरी पालकों की छाव में’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘कोई लौट के आया है’ आणि ‘इश्क में मरजावां’ सारख्या मालिकेतही तो दिसला होता. डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा 11 मध्येही शोएब दिसला. तिथे तो फर्स्ट रनर अप होता. दीपिका हिने सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे. आपल्या मुलाची काळजी घेण्यात ती सध्या व्यस्त आहे.

निर्माता संदीप सिकंद यांच्या या ऑफरनंतर दीपिका आणि शोएब पुन्हा एकदा टीव्हीच्या पडद्यावर परत येऊ शकतात. संदीप सिकंद यांनी दोन्ही स्टार्सला एका मालिकेत एकत्र कास्ट करायचे आहे. दोन कलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वांना दाखवायची आहे, असे म्हटले. मात्र, दोन्ही स्टार्सकडून अद्याप काहीही सांगण्यात आले नाही. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील आवडते जोडपे आहेत. त्यामुळे या जोडीला छोट्या पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.