Amitabh Bachchan Blog : सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत काम करणाऱ्या, आपल्या अभिनयाने रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांचे काल निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटात मुख्य भूमिका केल्या. तसेच अनेक हिंदी चित्रपटांत त्यांना अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, दिलीप कुमार यांच्यासह कामही केले. अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुलोचना यांच्या निधनाने बिग बींना मोठा धक्का बसला आहे. पडद्यावरील या आईच्या जाण्याने अमिताभ बच्चन शोकाकुल झाले आहेत.
सुलोचना दीदी यांचे पार्थिव शरीर आज संध्याकाळी पाच वाजतापर्यंत प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होतील.
ब्लॉगवर व्यक्त केल्या भावना
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर या दु:खद बातमीबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ आज आपण सिनेसृष्टीतील आणखी एका महान कलाकार सुलोचना जी यांना गमावले आहे. त्या एक सौम्य, दयाळू आणि काळजी घेणारी आई होती. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले…. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या.. आणि आज दुपारी आपल्या स्वर्गीय निवासासाठी त्या निघून गेली’ अशा शब्दांता बिग बी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. .
मी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होतो, त्यांच्या कुटुंबियांशीही संपर्कात होतो, असेही अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले होते. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने बिग बी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
Sulochana
(1974) Majboor -Amitabh Bachchan
(1968) Aadmi -Dilip Kumar
(1966) Aaye Din Bahaar Ke – Dharmendra
(1959) Do Ustad -Raj Kapoor pic.twitter.com/I5W6W8PbkN— Film History Pics (@FilmHistoryPic) July 30, 2019
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सुलोचना लाटकर यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. आपल्या कामाबद्दल बोलताना बिग बी म्हणाले की, आजही ते कामात होते, पण सुलोचना दीदी यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मावळला.
अमिताभ बच्चन यांच्यासह केले अनेक चित्रपटांत काम
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी अमिताभ यांच्यासोबत रेश्मा और शेरा (1971), याराना (1981), मुकद्दर का सिकंदर (1978), मजबूर आणि रोटी कपडा और मकान (1974) या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली.
दरम्यान अभिनेता रितेश देशमुख यानेही सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सुलोचना दिदी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठीसह हिंदी चित्रसृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली. ???? pic.twitter.com/15SApfbwo4
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 4, 2023
गेल्या काही दिवसांपासून सुलोचना दीदी श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले.