अमिताभ बच्चन यांनी माधुरीसोबत काम न करण्याची शपथ का घेतली? चित्रपटांबाबत दोघांमध्ये आजही छत्तीसचा आकडा

| Updated on: Mar 23, 2025 | 2:03 PM

माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांच्यातील चित्रपटाच्या सेटवर झालेल्या वादाबद्दल फार कमी जणांना माहित आहे. पण हा वाद आणि अमिताभ यांना माधुरीचा एवढा राग आला होता की त्यांनी पुन्हा तिच्यासोबत काम न करण्याची थपथ घेतली होती. पण नेमकं झालं काय होतं? जाणून घेऊयात तो किस्सा

अमिताभ बच्चन यांनी माधुरीसोबत काम न करण्याची शपथ का घेतली? चित्रपटांबाबत दोघांमध्ये आजही छत्तीसचा आकडा
Amitabh Bachchan & Madhuri Dixit, The Untold Story Behind Their Feud
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे दोघेही चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहेत. बिग बी गेल्या 56 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहेत, तर माधुरीही 41 वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग आहे. बिग बी यांनी त्यांच्या कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, तर माधुरीने 72 हून अधिक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

माधुरीसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती

दोघांनीही त्यांच्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली अशी खास ओळख निर्माण केली आहे. दोघेही ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील ‘मेरे प्यार का रास चखना’ या गाण्यात दिसले होते. मात्र त्यानंतर त्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केलं नाही. पण असं का? कारण यमागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे त्यांच्यात झालेला वाद. हा वाद इतका टोकाला गेला होता की अमिताभ यांनी माधुरीसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती.

दोघांनाही एकत्र अनेक चित्रपट ऑफर झाले पण….

माधुरीने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर, दोघांनाही एकत्र अनेक चित्रपट ऑफर झाले पण गोष्टी यशस्वी झाल्या नाहीत. 1989 मध्ये ‘बंदुआ’ नावाचा चित्रपट बनवला जात होता. दोघेही या चित्रपटात काम करणार होते, पण काही कारणास्तव हा चित्रपट रखडला. त्यानंतर, दिग्दर्शक रितुपर्णो घोष यांनाही त्या दोघांना एका चित्रपटात कास्ट करायचे होते, परंतु रितुपर्णो हा चित्रपट बनू शकले नाही. माधुरीच्या कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा तिचे चित्रपट चांगले चालत नव्हते. त्यानंतर ती अनिल कपूरसोबत पडद्यावर दिसली. ही जोडी हिट झाली आणि दोघांनी ‘तेजाब’, ‘राम लखन’ आणि ‘परिंदा’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

अनिल आणि माधुरीची जोडी हिट झाली 

अनिल आणि माधुरीची जोडी हिट झाल्यानंतर, माधुरीला अमिताभ यांच्यासोबत एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. रिपोर्टनुसार अनिल कपूरने अभिनेत्रीला बिग बींसोबत काम करण्यास नकार दिला होता, कारण असे म्हटले जाते की अनिल कपूरला माधुरीची जोडी पडद्यावर इतर कोणत्याही अभिनेत्यासोबत दिसू द्यायची नव्हती.त्यानंतर अनिलच्या विनंतीवरून माधुरीने चित्रपट करण्यास नकार दिला होता.

माधुरी खूप गर्विष्ठपणे वागायची 

एक काळ असा होता जेव्हा अनिल कपूरचे चित्रपट फार काही चालत नव्हते, त्याचा स्ट्रगल सुरु होता. असे म्हटले जाते की त्यानंतर माधुरीने त्याच्यासोबत काम करण्यासाठी टाळायला सुरुवात केली. त्यावेळी माधुरीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 1988 मध्ये ‘शिनाख्त’ नावाच्या चित्रपटात दोघांनाही कास्ट करण्यात आलं होतं. रिपोर्ट्नुसार शूटिंग दरम्यान माधुरी खूप गर्विष्ठ असायची आणि ती पटकथेत बरेच बदल करण्याची मागणी करायची कारण तिला वाटत होते की तिची भूमिका अमिताभपेक्षा कमकुवत आहे. यावर बिग बी नाराज झाले आणि त्यांनी चित्रपट मध्येच सोडला आणि माधुरीसोबत पुन्हा कधीही काम न करण्याची शपथ घेतली. हे दोघेही तो वाद सर्वांसमोर दाखवत जरी नसले तरी त्या वादाची नाराजी आजही त्यांच्यात सुरुच आहे .