नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सध्या बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावरून बच्चन परिवारात एक वेगळ वातावरण सुरु आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल रोज नव नव्या अफवा समोर येत आहेत. मात्र अशा चर्चा किंवा अफवा यावर बच्चन किंवा राय यापैकी कोणत्याही कुटुंबाने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. देशात सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या यादीत ऐश्वर्या राय ही टॉपर आहे. तिची एकूण 800 कोटी इतकी प्रचंड संपत्ती आहे. अशातच आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये श्री राम मंदिरात राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर न्यासने बिग बी अमिताभ बच्चन यांना आमंत्रण पाठविले आहे. अमिताभ बच्चन या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन देखील जाणार आहेत अशी माहिती समोर आलीय.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी 5 कोटींची देणगी दिली आहे. राम मंदिर हे आपल्यासाठी भाग्याचा क्षण आहे. हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे तो सर्वांनी साजरा करायला हवा असे बिग बी यांनी म्हटले आहे. तसेच, आपण सहपरिवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.
अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच आणखीही काही स्टार कलाकारांनी राम मंदिरासाठी आपली तिजोरी उघडी केली आहे. यात सर्वाधिक दान हे खिलाडी अक्षय कुमार याने दिले आहे. अक्षय कुमार याने 10 कोटी इतकी रक्कम राम मंदिरासाठी दिली आहे. त्याने सोशल माध्यमावर एक पोस्ट करून असे म्हटले आहे की, ही आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की अयोध्येमध्ये राम मंदिराचे काम सुरु होत आहे. आता त्यासाठी आपले योगदान देण्याची वेळ आली आहे, असे त्याने म्हटले आहे.
किंग खान शाहरुख यानेही राम मंदिरासाठी 5 कोटी रुपये दान दिले आहे. परंतु, राम मंदिर ट्रस्टने शाहरुख खान याच्यासह आमीर खान, सलमान खान या तिन्ही खान कलाकारांना आमंत्रण दिले नाही. या पाठोपाठ अभिनेत्री कंगना रानौत हिनेही मोठे योगदान दिले आहे. अभिनेत्री कंगना ही भाजप समर्थक मानली जाते. तिने राम मंदिराला समर्थन देतानाचा दान पेटीत 2 कोटी रुपये जमा केले आहेत.
सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता सोनू निगम याने काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने राम मंदिरालाही भेट दिली होती. सोनू निगम यानेही 1 कोटी इतकी रक्कम दान दिलाची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे भाजप खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही 1 कोटी रुपयांची देणगी राम मंदिरासाठी दिली आहे. एक जुना मुद्दा संपला आहे आणि प्रगतीचा एक नवा मार्ग खुला झाला आहे अशी प्रतिक्रिया गंभीर याने दिली आहे.
रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये प्रभू श्री रामाची भूमिका करून घराघरात पोहोचलेले अभिनेता अरुण गोविल यांनीही राम मंदिरासाठी मोठी देणगी दिली आहे. अरुण गोविल यांनी यासाठी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याचप्रमाणे, दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण मालिकेत रामाची भूमिका करणारा कलाकार गुरुमित चौधरी यानेही 20 लाख रुपये दान दिले आहे.