मुंबई | 15 मार्च 2024 : बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी सकाळी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले . रिपोर्ट्सनुसार अमितभा बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आज सकाळी 6 च्या सुमारास अमिताभ यांना कडकोट सुरक्षा व्यवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. वयाच्या 81 व्या बिग बींवर ही शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. हार्ट ब्लॉकेजनंतर अमिताभ बच्चन यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र त्यानंतर खुद्द अमिताभ यांनीच ट्विट करून आपली प्रकृती ठीक असल्याची खबर सर्व चाहत्यांना दिली. ‘in gratitude ever..’ ( कायम कृतज्ञ) असे लिहीत बिग बी यांनी ट्विट शेअर केले.
कधी केली जाते अँजिओप्लास्टी ?
रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. जेव्हा एखाद्या रुग्णाला हार्ट ॲटॅक येतो आणि आणि अवरोधित धमन्या उघडण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. हृदयाच्या धमनीत ब्लॉकेज असल्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. आणि अशा वेळी हार्ट ॲटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हेच ब्लॉकेज हटवण्यासाठी रुग्णावर अँजिओप्लास्टी केली जाते. अमिताभ बच्चन यांच्यावरही हीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र ती का करण्यात आली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
T 4950 – in gratitude ever ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 15, 2024