मुंबई: बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ट्विटरवर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींचे अपडेटस् ते सातत्याने ट्विटवर टाकत असतात. आतादेखील बिग बी यांनी त्यांचा लडाखमधील (Ladakh) एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत अमिताभ बच्चन यांनी थर्मल सूट परिधान केलेला दिसत आहे. (Amitabh Bachchan returns from Ladakh due to minus 33 degrees temperature)
अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे, ते लडाखला गेले होते. मात्र, लडाखमधील हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे अमिताभ बच्चन यांना परतावे लागले. लडाखमध्ये त्यावेळी उणे 33 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. मी थर्मल सूट घातला होता. मात्र, हा सूटही मला थंडीपासून वाचवू शकला नाही, असे अमिताभ यांनी म्हटले आहे.
T 3774 – … went to Ladakh and back .. minus 33 degrees .. even this could ot save me from the cold .. !! pic.twitter.com/I2BduanyYY
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 5, 2021
गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. लडाखसारख्या अत्यंत उंचीवर असणाऱ्या दुर्गम प्रदेशात हिवाळ्यात तापमानाचा पारा प्रचंड खाली घसरतो. त्यामुळे हिवाळ्यात येथील वातावरण अत्यंत बिकट असते.
मात्र, चीनच्या धोक्यामुळे या जीवघेण्या थंडीतही भारतीय जवाना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खडा पहारा देत आहेत. सैनिकांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी भारतीय लष्कराने जय्यत तयारी केली आहे. या सैनिकांना खास बनावटीचे थर्मल सूट देण्यात आले आहेत. तसेच सीमेलगत अद्ययावत निवासी स्मार्ट कॅम्प बांधले आहेत. यात वीज, पाणी आणि हिटिंगसारख्या थंडीपासून वाचण्यासाठीच्या मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. या स्मार्ट कॅम्पला आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही दृष्टीने अत्याधुनिक बनवण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?
VIDEO: हातोड्याने अंडे फोडले, सुरीने ज्यूस कापला, गोठलेल्या थंडीत जवानांची झुंज
लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था
(Amitabh Bachchan returns from Ladakh due to minus 33 degrees temperature)