Caller Tune | महानायकाच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद होणार! आता ऐकू येणार लसीकरणाची धून…

| Updated on: Jan 14, 2021 | 5:01 PM

कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवण्यात यावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

Caller Tune | महानायकाच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद होणार! आता ऐकू येणार लसीकरणाची धून...
Follow us on

मुंबई : लवकरच मोबाईलवरील महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना प्रतिबंधाची माहिती देणारी कॉलर ट्यून बंद करण्यात येणार आहे. या कॉलर ट्यूनऐवजी आता कोरोना लसीकरणाची धून ऐकू येणार आहे. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे (Amitabh Bachchan’s Corona Caller tune will be removed from tomorrow).

कोरोना विषाणू संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला ऐकू येत होती. मात्र, ही कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवण्यात यावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

कॉलर ट्यून बंद करण्यासाठी जनहित याचिका

ए. के. दुबे आणि पवन कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या कॉलर ट्यून संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. ‘या कॉलर ट्यूनमुळे सगळेच ग्राहक त्रस्त असून, ही ट्यून लवकरात लवकर बंद करण्यात यावी, अशी सगळ्यांच्या वतीने विनंती’, असे या याचिकेत म्हटले आहे.

शुक्रवारपासून (15 जानेवारी) कोरोना कॉलर ट्यून हटवून त्या ऐवजी लसीकरणाची नवी ट्यून लावण्यात येणार आहे. आ नवा संदेश तयार करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. स्वास्थ मंत्रालय आणि सूचना प्रसारण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दरम्यान, सोमवारी या संदर्भातील बैठक पार पडली आहे. या नव्या कॉलर ट्यूनला अमिताभ बच्चन यांचा आवाज असणार की आणखी कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही कॉलर ट्यून देखील अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Amitabh Bachchan’s Corona Caller tune will be removed from tomorrow).

महाराष्ट्रातील नेत्यांचाही कॉलर ट्यूनवर आक्षेप

‘कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली होती. ‘कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही’, असे नांदगावकर यांनी म्हटले होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोना काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेली कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी केली होती.

(Amitabh Bachchan’s Corona Caller tune will be removed from tomorrow)

हेही वाचा :