अमिताभ बच्चन यांच्या कन्येने रॅम्प वॉक करताना केली ॲक्टींग, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

| Updated on: Nov 19, 2023 | 7:24 PM

बिग बी अमिताभ बच्चन यांची अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली कन्या श्वेता नंदा हीचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे. परंतू तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना काही पसंद पडलेला नाही. त्यांनी श्वेता नंदा हिला चांगलेच ट्रोल केले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कन्येने रॅम्प वॉक करताना केली ॲक्टींग, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
shweta nanda
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा सिनेमाच्या दुनियेपासून लांब असली तरी अधूनमधून तिची या ग्लॅमरस इंडस्ट्रीज या ना त्या बहाण्याने चर्चा होत असते. श्वेताला अभिनयात काही इंटरेस्ट असल्याचे दिसत नसल्याने ती ठरवून या दुनियेपासून लांब असते. परंतू सोशल मिडीयावर मात्र ती सक्रीय असते. नेहमी सोशल मिडीयावर स्वत:चे फॅमिली फोटो शेअर करत असते. या दरम्यान बच्चन दाम्पत्याच्या लाडक्या कन्येचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. श्वेता बच्चनला या व्हिडीओवरून ट्रोल केले जात आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये श्वेता नंदा रॅम्प वॉक करताना दिसत आहे. परंतू हा व्हिडीओ खूप जूना असल्याचे म्हटले जाते. श्वेताला अशा अंदाजात खूप कमी वेळा पाहायला मिळाले आहे. व्हिडीओत श्वेता पांढऱ्या रंगाच्या फिदरवाला आऊटफिट घालून वॉक करताना दिसत आहे. या रॅम्प वॉक करताना बिग बींचा लाडकी कन्या कधी एक्टींग करताना तर कधी दोन्ही हात हवेत हलविताना दिसत आहे. काही लोकांना हा प्रकारच कळालेला नाही.

युजरच्या आल्या प्रतिक्रीया

सोशल मिडीयावरील युजर्सना हा तिचा अंदाज अजिब वाटत आहे. हा व्हिडीओ साल 2016 रोजीचा आहे. डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या इव्हेंटमध्ये श्वेता हिने हा रॅम्प वॉक केला होता. जानी आणि खोसला यांच्या आंतरराष्ट्रीय फॅशन लाईन, वोल्वो S90 च्या इव्हेंटसाठी श्वेता शोस्टॉपर बनली होती. रॅम्प वॉक दरम्यान प्रत्येकाची नजर तिच्याकडे होती. परंतू तिचा हा अंदाज युजरला विचित्र वाटला. एका युजरने या व्हिडीओला कमेंट करताना तु जाता परत येऊ नको अशी कमेंट दिली आहे. तर एका युजरने स्वत:ला 10 वर्षांची मुलगी समजू नको असे म्हटले आहे. अशा आशयाच्या कमेंट या व्हिडीओला आल्या आहेत. श्वेता नंदा हीची कन्या नव्या नवेली हीने यावर्षी पॅरीस फॅशन विकमध्ये आपला डेब्यू केला आहे.