नागा अश्विन यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या Kalki 2898 AD या चित्रपटाची सर्वजण वाट पाहात आहेत, हा चित्रपट प्रदर्शिक होण्यापूर्वीच या चित्रपटात वापरलेली खास कार चर्चेत आहेत. आता आनंद महिंद्र यांनी बुज्जी कारला ड्राइव्ह करताना दिसले आहेत. काय आहे ही Bujji car तिचा वापर या सायन्स फिक्शन चित्रपटात अभिनेता प्रभास याने केला आहे. हा चित्रपटाचे बजेट देखील चर्चेचा विषय ठरले असून चित्रपट नावावरुनच आणि त्यातील स्टारकास्टवरुनही चर्चेत आहे.
महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्र सोशल मिडीयावर सक्रीय असतात. त्यांच्या पोस्ट देखील प्रेरक आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते नेहमीच कलागुणांचे कौतूक करीत असतात. त्यांच्या पोस्ट नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. ज्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी ते नागा अश्विन लिखित आणि दिग्दर्शित कल्की 2898 एडी या आगामी सायन्स फिक्शन चित्रपटात दिसलेली बुज्जी कार चालवून तिचा अनुभव घेतला आहे. भारतातील पहिला फॉर्म्युला वन कार चालक नारायण कार्तिकेयन यांने देखील बुज्जी कार चालवली आहे आणि ही कार चालवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती की ही एक स्पेसशिप वाटत आहे.
Kalki 2898 AD या चित्रपटात अभिनेता प्रभास याने वापरलेली बुज्जी कार वेगळी आहे. 27 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हे वाहन ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्र कंपनीच्या कोयम्बतूरच्या जयम मोटर्सच्या यांच्या सहकार्याने विकसित केले आहे.
येथे पाहा Bujji कारच्या ड्राईव्हचा आनंद महिंद्र यांनी घेतलेल्या अनुभवाचा व्हिडीओ –
#Bujji meets @anandmahindra…#Kalki2898AD #Kalki2898ADonJune27 pic.twitter.com/gZETpmPf7e
— Kalki 2898 AD (@Kalki2898AD) June 12, 2024
बुज्जी कार केशरी रंगाची आहे. या कारचे वजनच तब्बल 6 टन आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे बुज्जी कारमध्ये 47 किलोवॅटची पॉवरफुल बॅटरी आहे. याशिवाय ही कार 94 kW आणि 9800 Nm टॉर्क एवढी पॉवर जनरेट करते.
सर्वसाधारण कारमध्ये चार चाक आहेत. तर बुज्जी कारमध्ये चार नाही तर तीन टायर आहेत, दोन टायर समोर आणि एक टायर मागच्या बाजूला आहे. या कारमध्ये बसवलेले टायर्स खास कल्की चित्रपटासाठी डिझाइन केले आहेत. कारण समोरच्या टायरची लांबी 6.075 मिमी आणि रुंदी 3380 मिमी आणि उंची 2186 मिमी इतकी प्रचंड आहे. या कारमध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर केला आहे.