Anant-Radhika Wedding : होऊ दे खर्च, लग्न आहे घरचं.. ऐश्वर्या, प्रियांका,अनुष्कापेक्षाही अंबानीच्या घरचं लग्न सर्वात खर्चिक, कुणाच्या लग्नात किती खर्च ?

| Updated on: Feb 29, 2024 | 4:25 PM

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. त्यांच्या लाडक्या लेकाचं, अनंतचं राधिक मर्चंटशी लवकरच लग्न होणार असून, त्यापूर्वी जामनगर, गुजरातमध्ये 1 मार्चपासून प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होतील.

Anant-Radhika Wedding : होऊ दे खर्च, लग्न आहे घरचं.. ऐश्वर्या, प्रियांका,अनुष्कापेक्षाही अंबानीच्या घरचं लग्न सर्वात खर्चिक, कुणाच्या लग्नात किती खर्च ?
Follow us on

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात लवकरच सनईचे सूर घुमतील. मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. जुलैमध्ये त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये 1 मार्चपासून दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होणार आहे. या शाही लग्नासाठी आणि त्याआधीच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी देशातील तसेच विदेशातील अनेक सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती, उद्योगपती हजर राहणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अनंत-राधिकाच्या आलिशान लग्नासाठी तब्बल 1000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यापूर्वी अंबानी कुटुंबात दोन लग्न झाली. अंबानींची लेक ईशा हिच्या लग्नात 400 कोटी रुपये खर्च झाले होते. या लग्नात ईशाने तब्बल 90 कोटी रुपयांचा लेहंगा घालून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, अशी चर्चा होती.

बॉलिवूड सेलिब्रिटींच महागडं लग्न

फिल्म इंडस्ट्री देखील आपल्या मोठ्या फॅट वेडिंग बजेटमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी, अभिनेत्रींनीह लग्नासाठी कोट्यवधी खर्च केले. दीपिका पडूकोण, अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचं एकूण बजेटच 90-95 कोटी होतं. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने लग्नासाठी 15 कोटी रुपयांचा ड्रेस घातला होता, या यादीत ती अव्वल स्थानी आहे. मात्र, अंबानी कुटुंबातील केवळ एका लग्नाच्या बजेटमध्ये बॉलिवूडची 5 सर्वात महागडी लग्न झाली.

बॉलिवूडमधील सर्वात महागडी लग्न कोणाची, कोणी किती खर्च केला, चला जाणून घेऊया.

प्रियांका चोप्रा – निक जोनास (2018)

बजेट – 105 कोटी

व्हेन्यू – उम्मेद भवन पॅलेस, राजस्थान

प्रियांका- निकच्या लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था या पॅलेसमध्ये करण्यात आली. त्यासाठी 29नोव्हेंबर ते 3डिसेंबरपर्यंत पॅलेसमधील सर्व रूम्स बूक करण्यात आल्या. त्याचं रोजचं भाडं 67लाख रुपये होतं.

१५ कोटींचा वेडिंग ड्रेस

प्रियांका-निकचा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन, दोन्ही पद्धतींनुसार झाला. ख्रिश्चन वेडिंगसाठी प्रियांकाने राल्फ लॉरेन या इंटरनॅशनल डिझायनरच्या ब्रँडचा व्हाईडट गाऊन परिधान केला, ज्याची किंमत होती 15 कोटी रुपये. त्यामध्ये 11,623 स्वारोस्की क्रिस्टल, 32हजार मोती आणि 5600 सीड बीट्स लावले होते. सर्वात महागडा वेडिंग ड्रेस घालणारी प्रियांका चोप्रा ही दुसरी सेलिब्रिटी आहे. तर हिंदू रीतिरिवाजांनुसार झालेल्या लग्नासाठी प्रियांकाने सब्यासाचीने डिझाईन केलेला लेहंगा घातला, ज्याची किंमत होती 18 लाख रुपये.

 

दीपिका पडूकोण -रणवीर सिंग ( 2018 )

बजेट – 95कोटी

व्हेन्यू – इटली

बॉलिवूडचं बहुचर्चित कपल असलेल्या दीपिका-रणवीरचं लग्न इटलीतील लेक कोमो जवळील एका आलिशान व्हिला मध्ये झालं. सिंधी आणि कोंकणी पद्धतीने झालेल्या या लग्नासाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळी उपस्थित होती. या व्हिलामधील शानदार रूम्स लग्नासाठी बूक करण्यात आल्या. त्यांच एका दिवसाचं भाडं आहे 33 हजार रुपये. फक्त रूम्ससाठी कोट्यवधी खर्च झाले.

19 लाखांचा लेहंगा

15  नोव्हेंबर 2018 ला झालेल्या लग्नासाठी दीपिकाने लाल रंगाचा सुंदर लेहंगा घातला. सब्यासाचीने डिझाईन केलेल्या या लेहंग्याची किंमत आहे 19लाख रुपये. त्या लेहंग्याच्या ओढणीवर सौभाग्यवती भव असं लिहीण्यात आलं होतं, ज्याचा नंतर बराच ट्रेंड आला.

अनुष्का शर्मा- विराट कोहली (2017)

बजेट – 90 कोटी रुपये

व्हेन्यू – इटली

बॉलिवूडची नामवंत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या लग्नाचीही बरीच चर्चा झाली. त्यांनीही इटलीतील टस्कनी येथील 800वर्ष जुना व्हिलामध्ये लग्न केलं. त्यासाठी फक्त 42 पाहुणे आले होते. त्यांनी संपूर्ण व्हिला बूक केला. रिपोर्ट्सनुसार, तो जगातील दुसरा महागडा व्हिला आहे. एका रात्रीसाठी रुम बूक करण्यासाठीचे चार्जे 6 लाख ते 14 लाखांपर्यंत आहेत.

32 लाखांचा लेहंगा

या लग्नातील अनुष्काच्या लेहंग्याची खूप चर्चा झाली. लाल रंगाऐवजी पेस्टल कलरचा लेहंगा परिधान करून अनुष्काने एक नवा ट्रेंड आणला. 32दिवसांत 67 कारागिरांनी तयार केलेल्या या लेहेंग्याची किंमत होती 32 लाख रुपये. त्यानंतर भारतात झालेल्या रिसेप्शनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, अंबानी कुटुंब एम.एस. धोनी अशा अनेक VIP ना निमंत्रण देण्यात आलं होतं.

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा (2009)

बजेट – 80 कोटी

व्हेन्यू – खंडाळा

2009 साली अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बिझनेसमन राज कुंद्राशी आलिशान सोहळ्यात लग्न केलं. 2017 पर्यंत हे बॉलिवूडमधील सर्वांत महागडं लग्न होतं. या लग्नाचं बजेट होतं 80 कोटी रुपये. लग्नानंतर शिल्पा-राजने 80 किलोंचा केक कापला होता. साखरपुड्यासाठी राजने शिल्पाच्या बोटात 5 कोटींची अंगठी घातली.

50 लाखांची साडी

लग्नासाठी शिल्पाने तरूण तहलियानीने डिझाईन केलेली साडी नेसली त्याची किंमत होती 50 लाख रुपये. तर तिने घातलेल्या दागिन्यांची किंमत होती 3 कोटी रुपये.

असिन- राहुल शर्मा (2016)

बजेट – 50 कोटी रुपये

व्हेन्यू – नवी दिल्ली

अभिनेत्री असिन हिने 2016 साली मायक्रोमॅक्सचे CEO राहुल शर्माशी लग्न केलं. साखपुड्यादरम्यान राहुलने असिनच्या हातात 5 कोटींची अंगठी घातली. लग्नासाठी असिनने, सब्यासाचीने डिझाईन केलेला लेहंगा घातला, त्याची किंमत होती 7 लाख रुपये.

ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन (2007)

बजेट – 40कोटी

व्हेन्यू – प्रतीक्षा बंगला, मुंबई

बॉलिवूडची नामवंत अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबाचा सुपुत्र, अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांनी 2007 साली लग्न केलं. लग्नाचे सर्व विधी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यातच झाले. ऐश्वर्याच्या मेहंदी सेरेमनीसाठी खास राजस्थानहून 15 किलो मेंदी मागवण्यात आली. अमिताभ आणि जया बच्चन यांनी लाडक्या लेकाच्या लग्नात शानदार परफॉर्मन्स दिला.

75 लाखांची साडी

ऐश्वर्याने लग्नासाठी सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली. त्याकाळच्या प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाईन केलेल्या या साडीला खऱ्या सोन्याची जर होती. रिपोर्ट्सनुसार, या साडीची किंमत 75लाख रुपये होती.