देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेले, नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता यांचा धाकटा लेक अनंत अंबानी याच्या लग्नाची चर्चा गेल्या काही काळापासून होत आहे. अनंत आणि त्याची भावी पत्नी राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन यावर्षी मार्चच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरमध्ये झाले. यानंतर, दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशनमे महिन्याच्या शेवटच्या आठवड़्यात एका आलिशान क्रूझवर इटली येथे झाले. त्यामध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेकस्टार्सनी भाग घेतला. आता येत्या 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट कायमचे एकत्र येणार असून त्यांचा शानदार विवाहसोहळा पार पडणार आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नात हे स्टार्स करणार परफॉर्म
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै 2024 रोजी मुंबईत लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नापूर्वी मुकेश आणि नीता अंबानी यांनी 2 जुलै रोजी नवी मुंबईत 50 गरजू जोडप्यांचा लग्नसोहळा आयोजित केला होता. दरम्यान, आता अनंत – राधिकाच्या लग्नाशी संबंधित मोठी माहितीही समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध रॅपर आणि गायक ड्रेक हा अनंत आणि राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार आहेत. आंतरराष्ट्रीय कलाकार ड्रेक लवकरच भारतात येणार आहेत. त्यामुळे त्याचे चाहते भलतेच उत्सुक आहेत.
एवढंच नव्हे तर ड्रेक व्यतिरिक्त अंबानी कुटुंबाची व्यवस्थापन टीम इतर आंतरराष्ट्रीय कलाकारांशी चर्चा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिकाच्या लग्नात अमेरिकन गायिका लाना डेल रे आणि ब्रिटीश पॉप सिंगर ॲडेल देखील परफॉर्म करू शकतात. राधिका मर्चंट ही लाना डेल रेची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे आपल्या भावी सूनबाईंच्या आनंदासाठी अंबानी कुटुंबाने तिचा परफॉर्मन्सही आयोजित केला आहे. अंबानी यांची मॅनेजमेंट टीम या स्टार्सशी बोलणी करत आहेत. त्यांची तारीख आणि फी याबद्दल बोलणी सुरू असल्याचे समजते.
प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये धमाका
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा 12 ते 14 जुलै दरम्यान पार पडणार आहे. या लग्नाला बॉलीवूड स्टार्ससोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गजही हजेरी लावणार आहेत. या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गुजरातध्ये झालेल्या अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये हॉलिवूड गायिका रिहाना, द बॅकस्ट्रीट बॉईज, पिटबुल आणि इटालियन ऑपेरा गायिका अँड्रिया बोसेली यांनी परफॉर्म केले. या जोडप्याच्या सेलिब्रेशनचे फोटो कित्येक दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर मे महिन्याच्या शेवटी क्रूझवर झालेल्या सोहळ्यातही अनेक कलाकारांनी हजेरी लावत धमाल केली होती.
कुठे होणार लग्न ?
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकणार आहेत. 12 जुलै रोजी दोघांचे भव्य लग्न होणार आहे. यानंतर 13 जुलै रोजी दोघांचा शुभ आशीर्वाद सोहळा होणार आहे. 14 जुलै रोजी एका ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये जगभरातील व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पाहुणे सहभागी होऊन या जोडप्याला शुभेच्छा देतील.