Anant- Radhika Wedding : वरमाईचा 500 कोटींचा नेकलेस ते अनंतचे कोट्यवधींचे घड्याळ..अंबानींच्या लग्नातील सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या ?

| Updated on: Jul 16, 2024 | 10:44 AM

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला अंबानी कुटुंबातील लग्नसोहळा अखेर संपला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न हे या शतकातील सर्वात महागडे लग्न ठरले आहे. या शाही लग्नातील सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या होत्या, त्यावर एक नजर टाकूया.

Anant- Radhika Wedding : वरमाईचा 500 कोटींचा नेकलेस ते अनंतचे कोट्यवधींचे घड्याळ..अंबानींच्या लग्नातील सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या ?
Follow us on

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अंबानींचा प्रा-वेडिंग सोहळा, नंतर क्रूझवरील शानदार पार्टी आणि त्यानंतर जुलैपासून सुरू झालेले लग्नाचे विधी, १२ जुलैला झालेलं शानदार लग्न, रिसेप्शन…. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला अंबानी कुटुंबातील लग्नसोहळा अखेर संपला आहे. १२ जुलै रोजी थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पार पडला. हा शाही विवाह फक्त देशातच नव्हे तर जगभरातही गाजत होता. हा लग्नसोहळा येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. अनंत आणि राधिकाच्या शाही लग्नात मुकेश अंबानींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यांचे दागिने, कपडे, शानदार सजावट, पाहुण्यांसाठी खास गिफ्टस, सेलिब्रशनमध्ये काहीच कमी नव्हती. हे या शतकातलं सर्वात महागडं लग्न आहे. अनंत आणि राधिकाच्या या शाही लग्नातील सर्वात महागड्या गोष्टींवर एक नजर टाकूया.

अनंत-राधिकाच्या लग्नात 5000 कोटी रुपये खर्च

रिपोर्ट्सनुसार, राजकुमारी डायना आणि प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाच्या खर्चापेक्षा अंबानींच्या लग्नाचा खर्च जास्त झाला आहे, जो अंदाजे 163 दशलक्ष डॉलर्स आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला जवळपास 5000 कोटी रुपये खर्च आला होता. प्री-वेडिंग फंक्शन्सचाही संपूर्ण लग्नाच्या खर्चात समावेश केला जातो. प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी 300 दशलक्ष डॉलर्सचे बजेट होते. त्यामध्ये एक लक्झरी क्रूझचा देखील समावेश होता ज्यामध्ये कॅटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईज यांनी परफॉर्म केलं होतं.

 

नीता अंबानी यांच्या नेकलेसची किंमत किती ?

अंबानी कुटुंबातील महिलांनी या काळात मौल्यवान दागिने आणि कपडे घातले होते. नीता अंबानी यांनी 400 ते 500 कोटी रुपयांचा पन्ना जडलेला डायमंड नेकलेस घातला होता. हा नेकलेस त्यांनी सोन्याच्या साडीवर घातला होता होती. हा हार जगातील सर्वात महागड्या हारांपैकी एक मानला जात होता. श्लोका अंबानी हिने देखील अशाच किमतीचा नेकलेस परिधान केला होता.

 

अनंतने मित्रांना दिलं कोट्यावधींचं घड्याळ

या लग्नात नवरदेव अनंतने पाटेक फिलिपचे घड्याळ घातले होते, ज्याची किंमत 67.5 कोटी आहे. अंबानी कुटुंबाने परिधान केलेले महागडे कपडे, दागिने आणि घड्याळे चर्चेत तर होतीच पण याशिवाय त्यांनी पाहुण्यांना आलिशान भेटवस्तूही दिल्या. अनंतने शाहरुख खान, रणवीर सिंग, विकी कौशल आणि इतरांसह इंडस्ट्रीतील त्याच्या सर्व जवळच्या मित्रांना 2 कोटी रुपयांचे घड्याळ भेट दिले. इतर अनेकांना डिझायनर लुई व्हिटॉन बॅग, सोन्याच्या चेन आणि डिझायनर शूज देखील मिळाले. या सर्वांव्यतिरिक्त, या खर्चामध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार आणि संगीत उद्योगातील अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश होता ज्यांनी या सोहळ्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. खाजगी चार्टर्ड फ्लाइट्स, लक्झरी कार आणि अनेक आलिशान गोष्टींचा समावेश होता.

 

अनंत आणि राधिकाचे लग्न झाले आहे, परंतु जर तुम्ही विचार करत असाल की अंबानी कुटुंबाचा सोहळा संपला, तर तसं नाही. कारण अनेक रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर लंडनमध्ये एक भव्य सेलिब्रेशन होणार आहे. मात्र, त्याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.