Shah Rukh Khan : लग्न अंबानींचं, चर्चा मात्र किंग खानची ! अमिताभ बच्चन समोर येताच शाहरुखने चक्क ..

| Updated on: Jul 13, 2024 | 11:23 AM

गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती, तो अनंत अंबानी आणि राधका मर्चंट यांचा विवाहसोहळा काल पार पडला. या शाही सोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीो आहे किंग खान शाहरूख याचा. सध्या सगळीकडे त्याच व्हिडीओची चर्चा सुरू आहे.

Shah Rukh Khan : लग्न अंबानींचं, चर्चा मात्र किंग खानची ! अमिताभ बच्चन समोर येताच शाहरुखने चक्क ..
Follow us on

जगातील सर्वात मोठ्या, नामवंत उद्योगपतींपैकी एक , अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे लग्न काल झाले. अनंत आणि राधिकाने काल एकमेकांशी शाही सोहळ्यात विवाह केला. या लग्नासाठी जगभरातून अनेक पाहुणे उपस्थित होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून या लग्नाची चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात लग्नाची फंक्शन्सही पार पडली. मामेरू, संगीत, हळद, मेहंदी यानंतर काल जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हजारो पाहुण्यांच्या उपस्थिती राधिक-अनंतने सप्तपदी घेतल्या. मात्र सध्या त्यांच्यापेक्षा एक वेगळ्याच व्यक्तीची चर्चा होत आहे. तो म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार, किंग खान शाहरूख. या लग्नासाठी शाहरुख हा त्याची पत्नी गौरी तसेत सुहान आणि आर्यन खान हेही उपस्थित होते. मात्र लग्नाचे विधी सुरू असतानाच शाहरुऱने असं की केलं, ज्यामुळे सगळे त्याचीच चर्चा करत आहेत.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो सचिन तेंडुलकर, रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांना भेटताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुखचा नम्र स्वभाव दिसत असून, तो पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

शाहरूखवर फिदा झाले चाहते

लग्नासाठी शाहरुख खानने एंट्री घेतली आणि तो एकामागून एक सर्वांना भेटत होता, तेच या व्हिडीओत कैद झाले आहे. त्यावेळी प्रथम त्याने हात जोडून रजनीकांत आणि त्यांच्या पत्नीला नमस्ते म्हटलं. यानंतर त्याने आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी हस्तांदोलन केले. मात्र तेवढ्यात त्याला समोरून जया बच्चन आणइ अमिताभ बच्चन येताना दिसले. त्यांना पाहून शाहरुख आपणहून पुढे आला. त्याने खाली वाकून जया आणि अमिताभ यांच्या पाय पडून नमस्कार केला. नंतर तो त्या दोघांशीही बराच वेळ बोलत होता. शाहरुखचा हा नम्र स्वभाव चाहत्यांना खूप आवडला आहे आणि त्याच्या गोड वागण्याबद्दल, समोरच्याचा आदर ठेवण्याच्या त्याचा वृत्तीबद्दल लोक  त्याचं कौतुक करत आहेत.

 

एका चाहत्याने लिहीलं- शाहरुख कुठेही असला तरी तो त्याच्या आजूबाजूचे वातावरण खूप चांगले ठेवतो. तो सगळ्यांना आनंदी ठेवतो आणि स्वतः हसत राहतो. तर दुसऱ्या फॅनने त्याला दुजोरा दिला आणि म्हणाल की – म्हणूनच तो ( शाहरुख) राजा आहे. हा माणसू कधीच कोणाला ऑकवर्ड वाटू देत नाही, असे एकाने लिहीलं. एकंदर सगळ्यांनीच शाहरूख याच्या स्वभावाचे कौतुक केलं.

अनंत राधिकाच्या लग्नासाठी किम कार्दशियन, जॉन सीना, निक जोनास, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, सलमान खान, रणवीर सिंग, कतरिना कैफ, विकी कौशल आणि संजय दत्त यांसारखे स्टार्स आले होते. त्यांनी वधू-वरांना शुभेच्छाही दिल्या.