Ananya Panday – Aditya Roy Kapur | अजून एका रोमँटिक व्हेकेशनवरून परतले आदित्य-अनन्या; या ‘ठिकाणी’ झाले स्पॉट

| Updated on: Sep 01, 2023 | 4:24 PM

अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा आहेत. दोघेही एकमेकांनी अनेक महिन्यांपासून डेट करत असून काही दिवसांपूर्वीच ते स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. आता पुन्हा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

Ananya Panday - Aditya Roy Kapur | अजून एका रोमँटिक व्हेकेशनवरून परतले आदित्य-अनन्या; या ठिकाणी झाले स्पॉट
Follow us on

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच काळापासून फिरत आहेत. मात्र असे असले तरीही त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण ते दोघे बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य आणि अनन्या नुकतेच गोवा एअरपोर्टवरही एकत्र येताना दिसले होते. गोव्यामध्ये दोघेही मस्त सुट्टी एन्जॉय करून आल्याची चर्चा तेव्हापासून सुरू झाली आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा एका व्हिडीओ शेअर करण्यात आला असून ते दोघेही गोवा एअरपोर्टवर दिसत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही लव्हबर्ड्सनी एकमेकांसोबत ट्विनिंग केले होते. स्टुडंट ऑफ द इयर फेम अनन्याने डेनिम जीन्स आणि क्रीम कलरचा प्रिंटेड टीशर्ट घातला होता. तर चॉकलेट बॉय आदित्यनेही फुल-स्लीव्हचा व्हाईट टीशर्ट आणि ट्राऊझर परिधान केली होती. दोघांनीही चेहऱ्यावर मास्कही लावले होते.

 

ड्रीम गर्लच्या स्क्रीनिंगलाही हजर होता आदित्य

दरम्यान आदित्यने त्याची प्रेयसी अनन्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला देखील हजेरी लावली होती. या चित्रपटात आयुष्मान खुरानाचीही मुख्य भूमिका आहे. चित्रपट पाहिल्यानंतर आदित्यने त्याचा रिव्ह्यूही दिला आणि म्हणाला, ” ( चित्रपट) फर्स्ट क्लास, हिट आहे.”

 

स्पेनमध्येही दिसले होते एकत्र

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच आदित्य आणि अनन्या हे स्पेनमध्ये एकत्र सुट्टी घालवताना दिसले होते. त्यांनी तेथे एक कॉन्सर्टलाही हजेरी लावली होती. त्यानंतर ते पोर्तुगालमध्येही स्पॉट झाले होते.

तर त्यापूर्वी , अनन्या आणि आदित्यने मार्च 2023 मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये मनीष मल्होत्राच्या ग्रँड फिनाले शोसाठी शो स्टॉपर म्हणून एकत्र एंट्री केली होती.

कामाबद्दल बोलायचं झालं तर अनन्या ही लवकर खो गए हम कहा या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार आहे. तर आदित्यच्या खिशात मेट्रो इन दिनो हा चित्रपट आहे.