Ananya Panday Trolled : दुकानदाराशी घासाघीस केल्याने अनन्या पांडे झाली ट्रोल, युजर्स म्हणाले – गरीबांचा पैसा

| Updated on: May 27, 2023 | 12:40 PM

अनन्या पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये अभिनेत्री एका दुकानदारासोबत घासाघीस करताना दिसत आहे.

Ananya Panday Trolled : दुकानदाराशी घासाघीस केल्याने अनन्या पांडे झाली ट्रोल, युजर्स म्हणाले - गरीबांचा पैसा
Image Credit source: instagram
Follow us on

Ananya Panday Trolled : बॉलीवूड स्टार्सची लाईफस्टाईल पाहून अनेकदा वाटतं की त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नसेल किंवा हे स्टार्स कधीच कोणाशी घासाघीस करत नसतील ना ? पण बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने केवळ बार्गेनिंगच केले नाही तर अवघ्या 1000 रुपयांमध्ये भरपूर खरेदीही केली आहे. वास्तविक अनन्या पांडेला एक टास्क देण्यात आला होता. जिथे त्यांना 1000 रुपयांमध्ये जास्तीत जास्त वस्तू खरेदी करायच्या होत्या.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अनन्या एका लोकल मार्केटमध्ये जाते आणि तिथून फॅशनशी संबंधित अनेक गोष्टी खरेदी करण्यास सुरुवात करते. तिने केसांच्या क्लिप, हँड बॅग आणि अनेक छोट्या वस्तू खरेदी केल्या आहेत. पण जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा तिचे बजेट 1000 रुपयांच्या वर जाते. त्यानंतर अनन्याने तिचे बार्गेनिंग कौशल्य दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर बरीच घासाघीस केल्यानंतर आणि दुकानदाराला तिच्यासोबत एक सेल्फी काढून देण्याचा सौदा करत तिने तिचं शॉपिंग बजेटमध्ये पूर्ण केलं.

 

मात्र या व्हिडीओमुळे अनन्या पांडेला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ती जेव्हा मोठ्या मॉल्समध्ये जाते तेव्हा ती कोणतंही बार्गेनिंग करते का असा प्रश्न लोकांनी विचारला. तर काही युजर्सनी तिला खडे बोल सुनावले आहेत. गरीबांचे पैसे खातेस, अशी टीकाही तिच्यावर करण्यात आली. एवढेच नव्हे तर एका युजरने कमेंट केली की तिथे पोहचण्यासाठी तू 2000 चे पेट्रोल वापरलेस ना. ब्रँडेड कपडे घेताना तर कोणी बार्गेनिंग करत नाही, फक्त गरीबांच्या दुकानातून माल घेतानाच तुम्ही घासाघीस करता. एकूणच अनन्याने हा टास्क पूर् केला असला तरी तिला बरंच ट्रोलिंग सहन करावं लागलं आहे.

तर काही यूजर्स असेही म्हणाले की ती किती ओव्हरॲक्टिंग करत आहे. अनन्या पांडेला काही पहिल्यांदाच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, कधी तिला तिच्या वक्तव्यामुळे तर कधी तिच्या प्रतिक्रियेमुळे ट्रोल केले जाते. अनन्या आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली असली तरी अभिनेत्री अजूनही एका मोठ्या चित्रपटाच्या शोधात आहे.