‘स्तनांच्या आकारावरून चिडवायचे,कुबड असलेली मुलगी…’; ट्रोलिंगला कंटाळून अखेर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला घ्यावी लागली थेरिपी

| Updated on: Dec 15, 2024 | 7:18 PM

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला सोशल मीडिया ट्रोलमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, या ट्रोलमुळे तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असल्याने तिने थेरिपीसुद्धा घेतली. सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे काही वर्ष ती प्रचंड भितीत होती. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने खुलासा केला आहे. 

स्तनांच्या आकारावरून चिडवायचे,कुबड असलेली मुलगी...; ट्रोलिंगला कंटाळून अखेर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला घ्यावी लागली थेरिपी
Follow us on

अभिनेत्रींचे आयुष्य म्हणजे कौतुक आणि ट्रोलिंगने भरलेलं असतं. पण काही अभिनेत्री ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देतात तर काहींना त्याचा काहीही फरक पडत नाही. पण काहीवेळेला होणारं ट्रोलिंग, कमेंटस् हे एवढ्या प्रचंड प्रमाणात असतं की त्यामुळे काहींच्या खाजगी आयुष्यावरही त्याचा परिणाम होत असतो, कारण त्या कमेंटस् या शक्यतो एखाद्या अभिनेत्रीच्या शरिरावरूनच केलेल्या असतात. अशावेळी मात्र ते सहन होण काहींना शक्य नसतं.

ट्रोलिंगमुळे अभिनेत्रीला झालेला मानसिक त्रास 

अशा ट्रोलिंगला सामोर जावं लागलं होतं एका पसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला. या अभिनेत्रीला सोशल मीडियावर आजही मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. ही अभिनेत्री आहे अनन्या पांडे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर पहिल्याच वर्षी काय घडलं यासंदर्भात तिने भाष्य केलं आहे. अनन्या पांडेने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा आपल्यावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितलं आहे.

‘वी द वुमन’ या विशेष कार्यक्रमामध्ये बरखा दत्त यांच्याबरोबर संवाद साधताना अनन्याने यासोबतच अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत “तुला सर्वात वाईट पद्धतीने ट्रोल कधी आणि कसं करण्यात आलं होतं?” असा सवाल अनन्याला विचारण्यात आला होता.

तेव्हा अनन्याने सांगितले की, “माझ्याबद्दल बरंच काय काय बोललं गेलं. त्यामुळे मी एखादी घटना सांगू शकत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा मनोरंजनसृष्टीत काम करु लागले तेव्हा कोणीतरी माझं फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं होतं. त्यावर त्यांनी ते माझ्यासोबत माझ्या शाळेत होते असं सांगून मी माझ्या शिक्षणाबद्दल खोटं सांगत असल्याचं लिहिलं होतं.”

‘सोशल मीडिया फार धोकादायक…’

पुढे ती म्हणाली, “सुरुवातीला मी ‘कोणीच यांच्यावर विश्वास ठेवणार नाही’ असा विचार करत होते. मात्र लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. तेव्हा काही दिवस माझी सोशल मीडियावर जाण्याची इच्छा होत नव्हती. सध्याचा काळ हा फार धोकादायक असून सोशल मीडियावर छोट्यात छोट्या आवाजालाही मोठं करुन सांगितलं जातं.” असंही अनन्याने सांगितलं.

“अनेकदा तुम्ही काहीतरी तुमच्याबद्दलची एखादी कमेंट स्कोअल करताना वाचून जाता आणि त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय हे तुम्हाला कळतही नाही कारण तुम्ही सारं काही सामान्य आहे असं स्वत:ला समजावत राहता. मी कमेंट वाचून विसरुन जाईल असं ठरवलं तरी होत नाही. काही आठड्यांनंतरही ती कमेंट कुठे ना कुठे तुमच्या डोक्यात सतत डोकावत राहते. त्यामुळे हे सारं असं डोक्यात साचत जातं आणि त्याचा त्रास होतो,” असं म्हणत अनन्याने तिच्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगितलं.

ट्रोलिंगला कंटाळून घ्यावी लागली थेरिपी

दरम्यान ट्रोलिंगला कंटाळून आपण चित्रपटसृष्टीमधील करिअरच्या सुरुवातीला मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला होता असंही अनन्याने म्हटलं आहे. “मी यापूर्वी थेरिपी घेतली आहे. मात्र आता मला त्याची गरज लागत नाही. मला आता माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता येतं. मला आधी या साऱ्यामुळे फार निराश वाटायचं. सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्याचा जवळचा संबंध आहे,” असंही अनन्या म्हणाली.

दरम्यान ट्रोलिंगबद्दल बोलताना तिने शाळेत असतानाचे किस्सेही सांगितले आहेत. अनन्याला शाळेत असतानाही प्रचंड ट्रोल केलं जायच. त्याचेही प्रसंग तिने सांगितले. अनन्याला शाळेत असताना तिच्या छातीचा उल्लेख करत चिडवलं जायचं, हिणवलं जायचं असं तिने सांगितले आहे. पुढे ती म्हणाली “मला ‘फ्लॅट चेस्ट’ म्हणजे वक्षस्थळं लहान असल्याने आणि ‘हेअरी’ म्हणजेच त्वचेवर भरपूर केस आहेत असं म्हणत चिवडलं जायचं”, असाही खुलासा तिने केला आहे.

“शाळेत असताना मला कुबड असलेली मुलगी असं चिडवायचे. मला माझ्या छातीवरुनही चिडवताना ‘छाती सपाट असणारी मुलगी’ म्हणजे स्तनांच्या आकारावरुन हिणवण्याचे प्रकार घडायचे. एवढच नाही तर मला शाळेत अगदी कोंबडीचे पाय आणि केसाळ मुलगी असंही चिडवलं जायचं. मात्र तेव्हा ते आमच्या पुरतं होतं. पण सोशल मीडियावर छोट्यात छोटी गोष्ट जगभर व्हायरल केली जाते. त्यामुळेच मला आता हा धोकायकाय काळ वाटतो,” हे किस्से सांगत अनन्याला शाळेत ही ट्रोलिंगचा कसा सामना करावा लागला याबद्दल सांगितले आहे.