छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’चे (Ratris Khel Chale 3) तिसरे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. इतकेच नव्हे तर, नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आता देखील अपूर्वाने असेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिनं लाल रंगाचं ड्रेस कॅरी केला आहे. सोबतच ‘अंधेरे सें कह दो बचपन बीत चूका हैं, अब तुझसे डर नहीं सुकून मिलता हैं’ असं कॅप्शनही दिलं आहे.
अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती. अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.
तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय. तिच्या चाहत्यांच्याही हे फोटो पसंतीस उतरले आहेत.