मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘थलायवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, पण त्याचवेळी ती सध्या चालू असलेल्या खटल्यांमुळेही चर्चेत आहे. आज (25 मार्च) अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात, जावेद अख्तर (जावेद अख्तर) यांनी कंगना रनौतविरूद्ध दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाची (Kangana Ranaut) सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर कोर्टाने कंगनाला जामीन मंजूर केला (Andheri Magistrate court grants bail to Kangana Ranaut in Javed Akhtar defamation matter).
वास्तविक, कोर्टाने कंगनाच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयाच्या विरोधात कंगनाने कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कंगना आज न्यायालयात हजर झाली होती आणि तिने कोर्टाला तिच्याविरूद्ध जारी केलेले जामीन वॉरंट रद्द करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती, त्या सुनावणीनंतर कोर्टाने कंगनाला जामीन मंजूर केला.
Mumbai: Andheri Magistrate court grants bail to Kangana Ranaut in Javed Akhtar defamation matter.
She had appeared before court today and had sought cancellation of the bailable warrant issued against her. She had also applied for bail which was allowed by the court
(File pic) pic.twitter.com/KwW2FsTNzl
— ANI (@ANI) March 25, 2021
कंगनाच्या प्रत्येक पावलावर जावेद अख्तर यांनी पाऊल उचलले आहे. आता कंगनाला जामीन मिळाल्यानंतर जावेद अख्तर यांची पुढची योजना काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला होता. त्यांनी कंगना विरोधात अंधेरी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता (Andheri Magistrate court grants bail to Kangana Ranaut in Javed Akhtar defamation matter).
जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये, यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना रनौतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी कंगनाला अनेकदा चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते, पण प्रत्येक वेळी ती काही कारणास्तव आपले निवेदन नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचू शकली नाही. यानंतर पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर अंधेरी मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी कोर्टाने या प्रकरणात कंगनाविरोधात जामीन वॉरंट बजावला होता.
त्यानंतर कंगनाने कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. हे प्रकरण हिमाचल प्रदेशात हस्तांतरित करण्याची मागणीही तिने केली होती. तथापि, जावेद अख्तर आपल्या खटल्याच्या बदली याचिकेविरोधात कोर्टात गेले आणि त्यांनी कॅव्हिएट दाखल केली. जावेद अख्तर यांनी कॅविटच्या माध्यमातून आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की, जर हिमाचलमध्ये केस ट्रान्सफर होत असेल, तर या प्रकरणावर योग्य सुनावणी होणार नाही. अनेकांना कॅव्हिएट म्हणजे काय हे माहित नसते, याचा अर्थ जर याचिकाकर्ता या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आपली बाजू ऐकली जाईल, याची खात्री करून घेततात.
(Andheri Magistrate court grants bail to Kangana Ranaut in Javed Akhtar defamation matter)
R Madhavan | आमीर खाननंतर आर. माधवनलाही कोरोनाची लागण, ‘ऑल इज वेल’ म्हणत शेअर केली पोस्ट!
Janhvi Kapoor | ‘फोटोतला तो मुलगा कोण?’, जान्हवी कपूरच्या नव्या फोटोंवर चाहत्यांचा सवाल!