तिसरं लग्नही मोडलं; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अखेर 8 वर्षांनी घटस्फोट, नवऱ्यावर गंभीर आरोप

| Updated on: Dec 31, 2024 | 7:50 PM

बॉलिवूडमध्ये अनेक जोडप्यांची लग्न आणि घटस्फोटही 2024 मध्ये पाहायला मिळाले. यात घटस्पोट घेण्यामध्ये आता एका पॉवर कपलचाही समावेश झाला आहे. तब्बल 8 वर्षांपासून ही घटस्फोटाची लढाई सुरु होती.

तिसरं लग्नही मोडलं; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अखेर 8 वर्षांनी घटस्फोट, नवऱ्यावर गंभीर आरोप
Follow us on

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा घटस्फोट झाला आहे. दोघेही आता अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. या लग्नातून दोघांना 6 मुलेही आहेत. अँजेलिना आणि ब्रॅडने २०१४ साली लग्न केले होते. हॉलिवूडच्या इतिहासातील हे सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक मानले जाते.

बॉलिवूडमध्ये अनेक जोडप्यांची लग्न झाली तसेच अनेक घटस्फोटही 2024 मध्ये पाहायला मिळाले. यात आता हॉलिवूडमधल्या एका जोडप्याचाही समावेश झाला आहे. ही प्रसिद्ध जोडी असून हॉलिवूडमधले त्या जोडीला पॉवर कपल म्हटलं जायचं

पॉवर कपलचा अखेर घटस्फोट

ही प्रसिद्ध जोडी आहे अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांची. या दोघांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. पण लग्नानंतर दोन वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला 8 वर्षे लागली. आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. अँजेलिनाच्या वकिलानेही याला दुजोरा दिला आहे.
काय म्हणाले वकील?

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या घटस्फोटाबद्दल बोलताना वकील जेम्स सायमन म्हणाले “8 वर्षांपूर्वी अँजेलिना जोलीने ब्रॅड पिटपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून सुरू झालेल्या दीर्घ प्रक्रियेचा हा भाग आहे. खरे सांगायचे तर अँजेलिना या सगळ्याला कंटाळली आहे.

मात्र आता अखेर हे सर्व संपल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये कलाकारांनी ज्युरींकडे सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कराराबाबत जो काही संभ्रम आहे, तो या सुनावणीत दूर होईल” असं म्हणत त्यांनी दोघांनीही घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं आहे.

काय होतं प्रकरण?

या प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर 2016 मध्ये अँजेलिना जोलीने ब्रॅड पिट विरुद्ध तिच्या आणि तिच्या मुलावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. या काळात अँजेलिनाने पिटवर गंभीर आरोप केले होते. ब्रॅड पिटने तिच्या एका मुलाचा गळा दाबला होता आणि तिच्या दुसऱ्या मुलाच्या तोंडावर मारले होते असे गंभीर आरोप तिने केले आहे. यानंतर हे वाद अधिकच वाढत गेले होते. आता अँजेलिना आपल्या मुलांसोबत वेगळी राहणार असून 8 वर्षांपासून सुरू असलेली घटस्फोटाची ही कायदेशीर लढाई आता संपुष्टात आली आहे.

अँजेलिनाचे तिसरे लग्न झाले

अँजेलिना जोलीबद्दल सांगायचे तर, 49 वर्षीय अभिनेत्रीचे हे तिसरे लग्न होते. तिचे पहिले लग्न 1996 मध्ये जॉनी ली मिलरसोबत झाले होते. हे लग्न 4 वर्षे टिकले. अभिनेत्रीने बिली बॉब थॉर्टनसोबत दुसरे लग्न केले होते. त्यांचे लग्न केवळ 3 वर्षे टिकू शकले. अभिनेत्रीच्या तिसऱ्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर तिने 2014 मध्ये ब्रॅड पिटसोबत केले होते. आता हे लग्नही संपुष्टात आले आहे.