बंगळुरू : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचे काही क्युट मोमेंट्स पुन्हा व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की विराट त्याच्या लेडी लव्हला स्पेशल वाटावे यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्यादरम्यान विराटच्या फ्लाइंग किसने (flying kiss) लोकांचे लक्ष वेधून घेतले.
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने याआधीही अनेकदा आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे. इतकंच नाही तर अनेक मुलाखतींमध्ये तो अनुष्काबद्दल मोकळेपणाने बोलला आहे. व्हायरल होत असलेली ताजी छायाचित्रे (viral photos) देखील अनुष्का आणि विराट यांच्यात अप्रतिम बॉन्डिंग असल्याचा पुरावा आहेत.
इथे पहा व्हायरल फोटोज
Kohli gives flying kiss to his favourite wife Anushka Sharma ?. pic.twitter.com/i5lPBXXrxG
— Suraj. (@suprsuraj) April 23, 2023
या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, अनुष्का किती उत्साहाने स्टेडियममध्ये पती विराट कोहलीला सपोर्ट करत आहे. अशा परिस्थितीत विराटला संधी मिळताच त्याने फ्लाइंग किस देणं, हे चाहत्यांसाठीही आश्चर्यापेक्षा कमी नाही. विराटच्या एका हातात चेंडू आहे आणि दुसऱ्या हाताने तो मागे वळून त्याच्या लेडी लव्हवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. या क्षणाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्याचवेळी विराटच्या या स्टाइलवर अनुष्काचे हावभावही पाहण्यासारखे होते. फ्लाइंग किस मिळताच अनुष्का लाल झाली. तिच्या चेहऱ्यावरील हास्यातूनही तिचे विराटबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत आहे. पण, नॅशनल टेलिव्हिजनवर काही लोकच त्यांच्या पत्नीवर इतके प्रेम दाखवू शकतात. जे विराट अनेकदा करतो. दरम्यान आयपीएलमध्ये विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कॅप्टनशिप उत्कृष्टपणे सांभळली. नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये आरसीबीने राजस्थान रॉयल्सवर 7 धावांनी विजयही मिळवला.
शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामधील सामन्यामध्ये आरसीबीने 7 धावांनी विजय मिळवला . शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये हर्षल पटेल याने जबरदस्त बॉलिंग करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 189 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाला 182 धावांपर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून हर्षल पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
राजस्थान संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र सुरूवात एकदम खराब झाली. सलामीवीर जोस बटलर याला मोहम्मद सिराजने बोल्ट आऊट केलं. त्यानंतर युवा यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी चांगली भागीदारी केली होती. दोघेही काही अंतराने बाद झाले, यामध्ये पडिक्कलने 52 धावा तर जयस्वालने 47 धावा केल्या. संजू सॅमसनला 22 धावांवर हर्षल पटेलने आऊट केलं. मोक्याच्याक्षणी खतरनाक हेटमायरला रन आऊट करत आरसीबीने सामना ओढला.
अश्विनने येत 12 धावा केल्या आणि काहीशी रंगत आणली मात्र तोही कॅच आऊट झाला. शेवटला दोन चेंडूत 10 धावांची गरज होती तेव्हा आरआरने अब्दुल बासिफ याला पाठवलं खरं पण त्याला काही चमक दाखवता आली नाही.
आरसीबीची बॅटिंग
आरसीबी संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. विराट कोहली आणि शाहबाज अहमद याला ट्रेंट बोल्ट या दोघांना बाद करत मोठे धक्के दिले होते. मात्र त्यानंतर फाफ आणि मॅक्सवेल यांनी 127 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. आरसीबीच्या 12 धावांवर दोन विकेट गेल्या होत्या त्यानंतर दोघांनी शतकी भागीदारी केली. 139ला फाफ धावबाद झाला होता त्यानंतर मॅक्सवेलही बाद झाला. दिनेश कार्तिक 16 धावा , वानिंदू हसरंगा 6 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही.