मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (bollywood actor arjun kapoor) आज आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भावनिक झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे, त्याने नुकतीचं एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये आईसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 2012 मध्ये मोना कपूर (mona kapoor) यांचा कॅन्सरच्या (cancer) आजारामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून अर्जून आईबद्दलच्या आठवणी नेहमी फेसबुक (facebook)आणि इंन्स्टाग्रामच्या (instagram) माध्यमातून चाहत्यांना सांगत असतो. त्यावरून त्याचं आईचं प्रेम किती दृढ होतं हे लक्षात येत. आज 3 फेब्रुवारी असून आज त्याचा आईचा वाढदिवस आहे. अर्जुनने पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींकडून (celibrity) त्याला आधार दिला गेल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच सकाळपासून नेटक-यांमध्ये अर्जुनच्या पोस्टची चर्चा आहे. तसेच विभक्त झाल्यानंतर संघर्ष केल्याची सुध्दा चर्चा आहे.
मलायकाने दिला आधार
आज सकाळपासून अर्जुनची पोस्ट चांगली चर्चेची ठरली असल्याचे आपण पाहतोय. कारण प्रत्येकजण त्यावर कमेंट करून शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अर्जुनची गर्लेफ्रेंड मलायका अरोरा हीने सुध्दा कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. 2012 मध्ये अर्जुनच्या आईचा कॅन्सर झाल्याने मृत्यू झाला आहे. आईला प्रेम न मिळाल्याने अर्जुन कपूर नेहमी आईच्या संपर्कात असायचा. तसेच कमी कालावधीत आई गेल्याने तो अधिक चिंताग्रस्त सुध्दा झाला होता. तेव्हा त्याला घरच्या सगळ्यांनी मोठा आधार दिला होता. “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई तूला. मला माझ्या फोनमध्ये तुझे नाव दिसले नाही. मी सध्या तुला पाहू शकत नाही.” अशी पोस्ट अर्जुन कपूर याने केली आहे.
9 वर्षापासून एकटं असल्यासारखं वाटतंय
मोनी कपूर यांचा पहिला विवाह बोनी कपूर यांच्याशी झाला होता. त्यावेळी मोना कपूर यांचं वय 19 होतं. त्यांच्यापेक्षा दहावर्षांनी मोठ्या असलेल्या बोनी कपूर यांच्याशी त्यांचं अरेन्ज मॅरेज झालं. दोघंही खूप आनंदी होते. त्यानंतर त्यांना अर्जुन आणि अंशुला अशी दोन मुलं झाली. त्यानंतर बोनी कपूर यांच्या आयुष्यात श्रीदेवी यांचा प्रवेश झाला आणि मोना कपूर आणि बोनी कपून विभक्त झाले. ती वेळ आमच्यासाठी अत्यंत वाईट होती. तसेच आम्हाला आमच्या कुटुंबियांकडून त्यावेळी चांगली साथ मिळाली असल्याचे सुध्दा अनेकदा मोनी कपूर यांनी सांगितलं आहे. आईने एकट्याने आणि संघर्षातून आयुष्य जगल्याने अर्जुन कपूर तिच्यासोबत कायम असायचा. परंतु कॅन्सर या आजाराने मोना कपूर यांना गाठले. त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्येकवेळी प्रत्येक क्षणाला तिची आठवण येत असल्याचे अर्जुनने सांगितले आहे. तसेच 9 वर्षापासून मला एकटं असल्यासारखं वाटतंय.