वयाने 2 वर्षांनी मोठ्या गर्लफ्रेंडसोबत प्रसिद्ध गायकाने गुपचूप उरकलं लग्न, फोटो व्हायरल

| Updated on: Jan 02, 2025 | 4:26 PM

प्रसिद्ध बॉलिवूड गायक गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला आहे. अरमानने गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत लग्नगाठ बांधली आहे. पण त्याने या लग्नाबद्दल कोणालाही कल्पना न देता गुपचूप लग्न उरकले आहे.

वयाने 2 वर्षांनी मोठ्या गर्लफ्रेंडसोबत प्रसिद्ध गायकाने गुपचूप उरकलं लग्न, फोटो व्हायरल
Follow us on

बॉलिवूडमध्ये तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. सर्वजण एकापाठोपाठ एक लग्नबंधनात अडकत आहेत. आता अजून एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहे. हा सेलिब्रिटी म्हणजे एक प्रसिद्ध गायक आहे. लाखो तरुणींच्या काळजाचा ठाव घेणारा हा प्रसिद्ध गायक बोहल्यावर चढला आहे.

अरमान मलिक अखेर लग्नबंधनात

हा प्रसिद्ध गायक आहे अरमान मलिक. अरमान अखेर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला आहे.त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत लग्नगाठ बांधली आहे. मात्र दोघांनीही लग्नाची भनक कोणालाही लागू न देता गुपचूप लग्न उरकले.

अरमानने त्याच्या लग्नाचे फोटो थेट शेअर करत लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनाही सुखद धक्का बसला. त्याच्या चाहत्यांसाठी हे खरोखरच मोठे सरप्राईज होतं.अरमानने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर काही फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीये.


गुपचूप उरकले लग्न 

अरमान आणि आशना अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 2024 मध्ये त्यांनी साखरपुडा करत त्यांचे नाते अधिकृतरित्या जाहिरही केले होते. अखेर आज ते दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. पण अरमानने त्यांच्या लग्नाबद्दल गुप्तता पाळली होती.  नवीन वर्षात अरमानच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर फोट व्हायरल

दोघांनीही लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या तुफान व्हायरल होत आहेत. अरमान आणि आशनावर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे. अरमानने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘तू माझं घर आहेस’असं लिहिले आहे.

लग्नासाठी हटके लूक 

अरमान आणि  आशना यांनी लग्नासाठी हटके असा लूक केल्याचं पाहायला मिळालं. अरमानने लग्नात गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती तर,आशनाने केशरी रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यासोबत तिने गुलाबी रंगाचा दुपट्टाही घेतला होता. त्यावर तिने ज्वेलरी घातलीये.गळ्यात चोकर आणि पांढऱ्या मोत्यांचा हार, बिंदी, कानातले आणि बांगड्या यामध्ये ती खूप सुंदर दिसतेय. दरम्यान, अरमान मलिकपेक्षा आशना वयाने दोन वर्षांनी मोठी आहे. अरमान 29 वर्षांचा असून आशना 31 वर्षांची आहे.

‘मैं रहूँ या ना रहूँ’, ‘जेहर’, ‘बोल दो ना जरा’, ‘पहेला प्यार’, ‘मुझको बरसात बना लो’ अशा गाण्यांनी तरुण पिढीला अरमान मलिकने वेड लावलं आहे. त्यांच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करतायत.