मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कर्जत येथील त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यांच्या अचानक एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रख्या कला दिग्दर्शकाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. १९४२ लव्ह स्टोरी, लगना, देवदास, जोधा अकबर अशा एकाहून एक सरस चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं आणि ते नावाजलंही गेलं. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नितीन देसाई यांनी कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय कामं केली आहेत. त्यापैकी महत्वाचं काम म्हणजे महाराष्ट्रातीव मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी मंच उभारणे. गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे जितके मुख्यमंत्री बनले त्यांच्या स्टेजची सजावट खुद्द नितीन देसाई यांनीच केली होती. जाणून घेऊया या अवलियाबद्दल
उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्वर लाखो जनतेच्या समोर शपथ घेतली होती.या समारंभासाठी भव्य मंच तयार करण्यात येणार होता, जो नितीन देसाई यांच्या देखरेखीखालीच तयार झाला. अवघ्या २० तासांत त्यांनी हा भव्य मंच तयार केली. विशेष बाब म्हणजे म्हणजे सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची विशालकाय मूर्ती. नितीन देसाई यांच्या या कामाचे प्रचंड कौतुक झाले होते.
1995 साली जेव्हा पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपाचे सरकारकर आले होते, तेव्हा शिवसेनेच्या मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्या मंचाची सजावट ही देखील नितीन देसाई यांनीच केली होती. एवढेच नव्हे तर 2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हाही मंचाची संपूर्ण सजावट नितीन देसाई यांच्या देखरेखीखालीच झाली होती.
नितीन देसाई यांचा प्रवास –
1993 साली आलेल्या विधु विनोद चोप्रा यांच्या ‘1942 अ लव स्टोरी’ या चित्रपटाच्या सेटमुळे नितीन देसाई यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘खाकी’ अशा चित्रपटांसाठीही त्यांनी भव्य दिव्य सेट डिझाईन केले. त्यानी आत्तापर्यंत 178 हून सेट डिझाइन केले आहेत.
नितीन देसाई यांना लगान, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांसाठी अने क पुरस्कार मिळाले आहेत. 2000 साली ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.