दिग्गज गायिका आशा भोसले हे वयाच्या 91 व्या वर्षीसुद्धा लाइव्ह कॉनसर्ट करतात, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. मुळात म्हणजे त्यांचा आवाज या वयातही तेवढाच गोड आहे. आशा भोसले यांच्या या वयातही असलेल्या एनर्जीचं सर्वजन कौतुक करतात.
दरम्यान आशा भोसले यांचा एक व्हडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये वयाच्या 91 व्या वर्षीही आशा भोसले यांनी त्यांच्या दमदार परफॉर्मन्समुळे सर्वांना नाचायला भाग पाडल्याच दिसून येत आहे. दुबईत आयोजित संगीत कार्यक्रमात आशा भोसले यांनी ‘तौबा तौबा’ हे सुपरहिट गाणे गाऊन या गाण्याची हुक स्टेप सादर केली.
आशा भोसलेंंचा ‘तौबा तौबा’वरचा भन्नाट परफॉर्मन्स
आशा भोसले यांच्या शोचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, त्या एका हातात माईक घेऊन काळ्या बॉर्डरसह पांढऱ्या रंगाच्या साडीत स्टेजवर उभ्या आहेत. गायक करण औजलाचे गाणे गायल्यानंतर आशा भोसले यांनीही या गाण्याची हुक स्टेप केली.
‘तौबा तौबा’ हे गाणे करण औजलाने संगीतबद्ध केले आहे. यासोबतच त्यांनी या गाण्याला आवाजही दिला आहे. ‘तौबा तौबा’ हे विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटामधील गाणे आहे. करण औजलाने याने आशा भोसले यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचं म्हटलं आहे.
करण औजलाने शेअर केला व्हिडीओ
करणने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, ‘संगीताची देवी आशा भोसले जी यांनी ‘तौबा तौबा’ गायले. एका छोट्या गावात वाढणाऱ्या मुलाने रचलेले गाणे. विशेष म्हणजे ज्या मुलाला संगीताची पार्श्वभूमी नाही. या गाण्याला केवळ चाहत्यांकडूनच नव्हे तर संगीत कलाकारांचेही खूप प्रेम मिळाले आहे, पण हा क्षण खरोखरच अविस्मरणीय आहे आणि तो मी कधीही विसरणार नाही. मी खरोखर धन्य आणि कृतज्ञ आहे. तुम्हाला असे सर्व ट्रॅक देत राहण्यासाठी आणि खूप आठवणी निर्माण करण्यासाठी हे मला खरोखर खूप प्रेरित झालो आहे.”
दुबईमध्ये होता लाइव्ह परफॉर्मन्स
असं म्हणत त्याने आशा भोसले यांचे आभार मानले तसेच त्याचे गाणे गायल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. तसंच पुढे तो म्हणाला ‘मी तौबा तौबा गाणे वयाच्या 27 व्या वर्षी लिहिले आणि आशाजी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी माझ्यापेक्षा चांगले गायले.
आशा भोसले आणि सोनू निगम यांनी रविवारी दुबईमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी एकत्र आले. सोनू निगम आणि आशा भोसले यांचा दुबईतील कोका-कोला एरिना येथे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं.