Photo : ‘बाबा लव्हज अर्जून…’, अभिनेता आरोह वेलणकरकडून बाळाचा पहिला फोटो शेअर
VN |
Updated on: May 14, 2021 | 1:54 PM
काही दिवसांपूर्वी आरोह बाबा झालाय. त्यानं आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (‘Baba Loves Arjun…’, first photo of baby shared by actor Aroh Welankar)
1 / 5
‘रेगे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल टाकणाऱ्या अभिनेता आरोह वेलणकर ‘मराठी बिग बॉस सीझन-2’मधून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील चाहत्यांची मनं जिंकली. सध्या आरोह ‘लाडाची मी लेक गं’ या मराठी मालिकेतून रसिकांच्या भेटील येतो.
2 / 5
काही दिवसांपूर्वी आरोह बाबा झालाय. चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. छोट्या पडद्यावरील हा मम्मीच्या लाडक्यानं आता आपल्या लाडक्याचा म्हणजेच आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
3 / 5
सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या आरोहने नुकतंच इन्स्टाग्रामवर मुलासोबतचा सुंदर फोटो शेअर केला आहे.
4 / 5
अभिनेता आरोह वेलणकर, दीर्घकालीन मैत्रीण अंकिता शिंघवी सोबत तीन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकला आहे.
5 / 5
अंकिता आणि आरोहची भेट कॉलेज कॅम्पसमध्ये झाली होती. आधी मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.