मुंबई : प्रख्यात अभिनेता अमित मिस्त्री (Amit Mistry) याच्या निधनाचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईतील राहत्या घरी कार्डिअॅक अरेस्टनंतर अमितने अखेरचा श्वास घेतला. क्या कहना, एक चालीस की लास्ट लोकल, 99, शोर इन द सिटी, यमला पगला दिवाना यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अमितने भूमिका केल्या आहेत. नुकताच तो बंदिश बँडिट्स या वेब सीरिजमध्ये झळकला होता. (Bandish Bandits fame Actor Amit Mistry Dies of cardiac arrest)
कायद्याचं शिक्षण घेताना अभिनय
महाविद्यालयीन जीवनात कायद्याचं शिक्षण घेताना अमित मिस्त्रीला अभिनयाची गोडी लागली. त्याने अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तो नवरात्रीमध्ये गाणंही गात असे. स्पर्धेत मनोरंजन विश्वातील मोठे लोक परीक्षक म्हणून येत असत, ज्यामुळे त्याची या विश्वात ओळख वाढत गेली. त्यानंतर पृथ्वी थिएटरमधून त्याने नाटक करायला सुरुवात केली. अभिनेते मकरंद देशपांडे यांच्यासोबत त्याने बरंच काम केलं आहे.
छोट्या पडद्यापासून सुरुवात
अनेक नाटकांत काम केल्यानंतर अमित मिस्त्रीला टीव्ही मालिकांमध्ये भूमिका मिळाली. ती त्याची पहिलीच मालिका होती. यात त्याच्यासोबत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेते लिलिपुट देखील होते. हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूपच आवडला. यानंतर, अमितचे नशिब चमकले आणि नंतर तो ‘शुभ मंगल सावधान शो’, ‘भगवान बचाए इनको’ यासारख्या मालिकांतही दिसला. टीव्हीनंतर त्याचा पुढचा टप्पा चित्रपटांमध्ये काम करण्याचा होता. त्याने सैफ अली खान आणि प्रीती झिंटाबरोबर ‘क्या कहना’ या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बंदिश बँडिट्समध्ये अखेरचं दर्शन
अमित मिस्त्री काही काळापूर्वी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘बंदिश बँडिट्स’ या वेब सीरीजमध्ये झळकला होता. नसिरुद्दीन शाह यांच्या धाकट्या मुलाची म्हणजे देवेंद्र राठोडची भूमिका त्याने साकारली होती. संगीतावर आधारित या वेब सीरीजमधील अमितच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. (Bandish Bandits Actor Amit Mistry)
Popular Gujarati actor #AmitMistry passed away earlier this morning following cardiac arrest.
Did films like Kya Kehna, Ek Chalis Ki Last Local, 99, Shor In The City, Yamla Pagla Deewana, Bey Yaar, A Gentleman and the Amazon Prime series Bandish Bandits.
Rest In Peace. pic.twitter.com/V3MfPkIHXN
— CinemaRare (@CinemaRareIN) April 23, 2021
एका शब्दाच्या भूमिकेने अभिनय प्रवास सुरु, अशी होती किशोर नांदलस्करांची कारकीर्द
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन
(Bandish Bandits fame Actor Amit Mistry Dies of cardiac arrest)