अभिनेत्री भूमी पेडणेकरची बहीण समीक्षा पेडणेकर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती, तिच्याशी निगडीत बऱ्याच इन्स्टाग्रामवर देखील शेअर करते. बहीण भूमीच्या लूकशी समीक्षाची बऱ्याच वेळा तुलना देखील केली जाते. याचदरम्यान आता समीक्षा तिच्या लूक्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचा आरोप काही सोशल मीडिया यूजर्सनी लावला. यावरून भडकलेल्या समीक्षाने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं. नक्की काय झालं, चला जाणून घेऊया.
खरंतर समीक्षा पेडणेकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मेकअप ट्युटोरिअल व्हिडीओ अपलोड केला. त्यामध्ये ती आणि भूमी मेकअप करताना दिसत आहेत. पण व्हिडीओ पाहून अनेक जण कन्फ्यूज जाले की खरी भूमी कोण आहे ? त्या दोघीही एकसारख्या दिसत असल्यामुळे यूजर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. पेडणकेर बहिणींनी प्लास्टिक सर्जरी केली, असंही काही यूजर्सनी म्हटलं. पण समीक्षाला काही हे पटलं नाही आणि तिने कमेंट्समधूनच ट्रोलर्सना सुनावत चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांचं तोंड बंद करून टाकलं.
समीक्षा भडकली
प्लास्टिक सर्जरीच्या कमेंटमुळे भडकलेल्या समीक्षाने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं. कोणती प्लास्टिक सर्जरी ? असं विचारत तिने ट्रोलिंग करणाऱ्या यूजर्सना ऐकवलं. एवढंच नव्हे तर दुसऱ्या एका यूजरच्या कमेंटवर तिने असं प्रत्युत्तर दिलं की सगळ्यांची बोलती बंद झाली. ‘ आम्ही एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून सेम दिसतो. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे.’ असं तिने म्हटलं.
भूमी पेडणेकरचे आगामी प्रोजेक्ट कोणते ?
भूमी पेडणेकर बद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘भक्षक’ चित्रपटात दिसली, तो फेब्रुवारी महिन्यात ओटीटीलर प्रदर्शित झाला. आता ती लवकरच ‘द लेडी किलर’ आणि ‘अफवाह’ सारख्या चित्रपटात झळकणार आहे.