बॉलीवूड इंडस्ट्रीत बोल्डनेसचे दुसरे नाव म्हणजे राखी सावंत (Rakhi sawant )होय. मात्र गेल्या काही दिवसांपासून राखी आपल्या बोल्ड लुक(Bold look) मध्ये न दिसता सिम्पल लुकमध्ये दिसून येत आहे. असे काय झाले की राखीने आपला लुक चेंज केला आहे . याचे मुख्य कारण म्हणजे तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड आदिल खान होय. मीडियारिपोर्ट्सनुसार, तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani)राखीला शॉर्ट ड्रेसेसमध्ये फिरताना दिसावं असं वाटत नाही. यामुळेच तिने आपलय लूकमध्ये बदल केला आहे. ती तिच्या जीवनशैलीत आदिलच्या मतानुसार बदल करत आहे. राखीही आता आदिलच्या आवडीचे कपडे घालते.
मीडिया रिपोर्टनुसार आदिल आणि त्याच्या कुटुंबाला ग्लॅमरस, बोल्ड लुक देणारे पेहराव फारसे आवडत नाही. अशी माहितीसमोर आली आहे. त्यामुळे तोकडे कराखी सावंतने सोडून दिले आहे. ‘तू मेरे दिल में रहने के लिए नहीं’ या गाण्याच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये आदिलसोबत पोहोचलेल्या राखीने त्यांच्या नात्यानंतरच्या आयुष्यात झालेल्या बदलांची चर्चा केली.
राखीने सांगितले की, जेव्हा ती शॉपिंगसाठी जाते आणि तिला शॉर्ट ड्रेस दिसला की खूप दुःख होते. तिला रडू येते. इतकेच नाही तर राखीने सांगितले की, जेव्हा ती एखाद्या मुलीला शॉर्ट किंवा रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पाहते, तेव्हा तिचा खूप हेवा वाटू लागतो. राखीने पुढे सांगितले की, तिला आदिलला कोणत्याही प्रकारे गमावायचे नाही आणि त्याच्या कुटुंबाला दु:खही द्यायचे नाही.त्यामुळे मी माझ्या स्वतःमध्ये बदल केला आहे.