आजकाल यूट्यूबवर अनेक पॉडकास्ट ट्रेंडमध्ये आहेत. या ट्रेंडला अनुसरून अनेक कलाकारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे पॉडकास्टही सुरू केले आहेत. त्यामध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. तो अभिनेता म्हणजे ‘बिग बॉस 13’ फेम पारस छाब्रा. त्याच्या या पॉडकास्टमध्ये आत्तापर्यंत विशाल आदित्य सिंग आणि आरती सिंग यांनी हजेरी लावली. तर काटा लगा फेम आणि बिग बॉसमधील एक स्पर्धक असलेल्या शेफाली जरीवाला हीदेखील या शोमध्ये नुकतीच येऊन गेली. शेफालीशी संवाद साधता साधता पारसने एक मोठा खुलासा केला. त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने त्याच्यावर कशी ‘काळी जादू’ केली होती, याबद्दल पारस पहिल्यांदाच बोलला.
जेव्हा शेफाली जरीवालाने पारसला विचारले की काळी जादू म्हणजे काय? तेव्हा पारसने सांगितलं की, ‘ हे अगदी खरे आहे, माझ्या एक्स गर्लफ्रेंडने माझ्यावर काळी जादू केली होती.’ पारस म्हणाला, “ मी कायम तिचाच रहावं अशी माझ्या एक्स-गर्लफ्रेंडची इच्छा होती. त्यावेळी मी त्याच्यासोबत होतो. पण मी तिला एकटं सोडून निघून जाईन अशी तिच्या मनात भीती होती. त्यामुळे सकाळी ती मला फूंकून पाणी द्यायची आणि मला असं वाटायचं की कदाचित तिच्या धर्मात लोकांना असंच पाणी प्यायला देत असतील. कारण ती आपल्या धर्माची नव्हती. पण तिने दिलेलं पाणी पिऊन मी पूर्णपणे तिच्या कह्यात होतो ‘ असा अनुभव पारसने सांगितला.
गर्लफ्रेंडनेच केली काळी जादू
पुढे पारस म्हणाला, “ मी ५ दिवसांसाठी मुंबईत आलो आणि संपूर्ण ५ महिने इथेच राहिलो. पाच महिन्यांनंतरही मी एकदाच माझ्या घरी गेलो होतो आणि तेही माझे कपडे घेण्यासाठी. माझी आईही ( ते पाहून) गोंधळली होती. पण इथे एक ट्विस्ट आला. ती मुलगी माझ्यावर प्रेम करत होती आणि तिचे कुटुंब माझा तिरस्कार करत होते. मीच त्या दोघांमध्ये समेट घडवून आणला. पण जेव्हा मी तिच्या कुटुंबीयांना भेटलो तेव्हा त्यांनीही माझ्यावर काळी जादू केली. पण त्यांच्या मुलीपासून दूर राहण्यासाठी ही जादू होती. त्यांनी मला चहा दिला, पण मला तो चहा वेगळा वाटला. मात्र मी फारसा विचार केला नाही. चहा प्यायल्यावर मला विचित्र वाटायला लागलं. मी डॉक्टरांकडेही गेलो होतो, माझे सर्व रिपोर्ट्स बरोबर होते.” अशी आठवण पारसने सांगितली.
कसा बरा झाला पारस छाब्रा ?
मात्र रिपोर्ट नॉर्मल येऊनही पारसला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि म्हणून तो पुन्हा एका बाबांकडे गेला. बाबांनी त्याला थोडा उतारा दिला आणि या युक्तीनंतर ती मुलगी पारसच्या मनातून पूर्णपणे गेली. त्याला खूप हलकं आणि फ्रेश वाटू लागलं.
या पॉडकास्टमध्ये शेफालीशी बोलताना पारसने सांगितलं की त्याच्यासोबत जे घडलं त्यानंतर त्याची ज्योतिष शास्त्रातील आवड वाढली आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा निर्णय त्याने घेतला.
बिग बॉसमध्ये येण्याआधी पारस छाब्रा स्प्लिट्सविलासारख्या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. मात्र, या दोन्ही रिॲलिटी शोमध्ये पारस काही चमक खास दाखवू शकला नाही.