मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात कॉन्ट्रीवर्शिअल शो “बिग बॉस” लवकरच आपला नवा सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस (Bigg Boss) शो होस्ट करतो. यामुळे याचा एक सिजन संपला की त्याच्या दुसऱ्या सिजनची चाहत्यांना प्रतिक्षा असते. बिग बॉसचा 16 वा(Bigg Boss 16) सिजन ऑक्टोबल महिन्यात सुरु होणार असून असून लवकरच यांची घोषणा होणार आहे. नेमही प्रमाणे यंदा ही कोणते स्पर्धक यात सहभागी होणार याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.
बिग बॉस हा टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय शो मानला जातो. सलमान खान अनेक वर्षांपासून हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. या शो ने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. करिअर मध्ये ट्विस्ट आणण्यासाठी छोट्या-मोठ्या पडद्यावरील सर्वच कलाकार तसेच विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी या शो मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असतात. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना दिले जाणारे टास्क, स्पर्धकामधील भांडण तसेच बिग बॉसच्या घरात होणारी लव्ह अफेअर्स यामुळे हा शो चांगलाच चर्चेत असतो.
बिग बॉस शोची फॅन फॉलोइंग लाखोंच्या घरात आहे. नेहमी प्रमाणे बिग बॉसचा 16 वा सिजन देखील नवीन आणि रोमांचक ट्विस्टसह टीव्हीवर परत येत आहे. सीझन 15 पेक्षा या 16 व्या सिजनमध्ये मनोरंजनाचा धमाका पहायला मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
या शोचा भव्य प्रीमियर आणि शो ची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. बिग बॉस 16 शोचा भव्य प्रीमियर 1 ऑक्टोबर 2022 रोजी होणार असल्याचे वृत्त आहे. एका मीडिया पोर्टलच्या वृत्तानुसार, हा शो ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. त्याचबरोबर यावेळीही सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अभिनेता बिग बॉसचा प्रोमो शूट करणार आहे. शोच्या निर्मात्यांनी स्पर्धक म्हणून अनेक मोठ्या सेलिब्रिटींशी संपर्क साधला असल्याचेही समजते.
बिग बॉसच्या 16 व्या सिजनमध्ये टीव्हीची प्रसिद्ध सून दिव्यांका त्रिपाठी ते सनाया इराणी आणि अर्जुन बिजलानी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत यापैकी एकाही स्टारने या शोमध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात दावा केला जातो की बिग बॉसच्या घराची थीम कशी असेल. बिग बॉस 16 मध्ये अॅक्वा ब्लू कलरची थीम असणार आहे.
कॉन्ट्रव्हर्शिअल क्वीन राखी सावंतनेही बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राखीला तिचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करायचा आहे. बिग बॉसचा 15वा सीझन तेजस्वी प्रकाशने जिंकला होता, तर करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल हे उपविजेते होते.