मुंबई | 20 जानेवारी 2024 : Bigg Boss चा 17 वा सीझन आता शेवटाकड येत असून लवकरच त्याचा फिनाले पार पडेल. त्यासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत, त्यामुळ सगळेच स्पर्धक कंबर कसून मेहनत करत आहेत. टॉप ३ मध्ये जाण्याचं आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचं सगळ्याच स्पर्धकांचं स्वप्न आहे. यासाठी सगळ्यांनीच नवे डावपेट आखत,मेहन सुरू केली आहे. शो संपण्यापूर्वी बिग बॉसने आता स्पर्धकांकडून नवी ॲक्टिव्हिटी करून घेतली, आणि ते काम होतं एकमेकांना रोस्ट करणं. येत्या काही एपिसोड्समध्ये दिसेल की या शोमध्ये कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी यांच्यासह बाहेरचे काही लोक बीबी हाऊसमध्ये आले आहेत.
आणि घरातील स्पर्धक त्यांच्यासमोर स्टँडअप कॉमेडी करतील. या शोचे अनक प्रोमो समोर आले आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे पहिल्यादांच अभिनया व्यतिरिक्त स्टँडअप कॉमेडी करताना दिसली. मात्र त्याच दरम्यान तिने असं काही वक्तव्यं केलं जे ऐकून तिथले लोकच नाही प्रेक्षकही हैराण झाले. त्या वाक्यांमधून अंकिताने तिच्या सासूला चोख प्रत्युत्तर दिल्याचं अनेक यूजर्सचं म्हणणं आहे.
अंकिताने पती विकी जैनला केलं रोस्ट
कॉमेडीची सुरूवत अंकिताने तिच्या आणि मुनव्वरच्या मैत्रीने केली. त्यानंतर तिने तिचा पती विकी जैनलाच रोस्ट केलं. ‘ विकी, मी तुला सोडणार नाही. कधीच सोडणार नाही. या घरात माझी आणि विकीची अनेक भांडणं झाली, पण आमची भांडणं फक्त इथेच होतात असं नाही. आम्ही घरीही असेच भांडतो. जर तुम्ही आमच्या (घरातलं) सीसीटीव्ही फूटेज पाहिलं तर तुम्हाला बिग बॉसचे 5-6 एपिसोड नक्की दिसतील,’ असं अंकिताने सुनावलं.
सासूलाही दिलं चोख प्रत्युत्तर
‘ मी इथे ( स्टँड अप कॉमेडीमध्ये) टिकून राहण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. हसू येऊ नये असाही माझा प्रयत्न आहे. कारण माझा पती विकी फक्त इथेच माझं ऐकून घेईल, एरवी तर तो माझं ऐकत नाही’, असं अंकिता म्हणाली. ‘ मी इनसेक्युअर असू शकते, पझेसिव्हही असेन कदाचित. विकीला काहीही बोलत असेन, त्याला लाथ मारत असेन, त्याच्यावर उशीही फेकून मारत असेन. पण मी कशीही असले तरी (आमचं) नातं मनापासून निभावते आहे. कारण काहीही झालं तरी अंकिता लोखंडेची ओळख “पवित्र रिश्ता” मुळेच आहे ना ‘ असंही ती म्हणाली.
यावरून तिने तिच्या सासूबाईंनाच सुनावल्याची चर्चा युजर्समध्ये रंगली आहे. अंकिताने तिच्या सासूच्या वक्तव्यांवर चोख प्रत्युत्तर दिल्याचंही यूजर्स म्हणत आहेत. अंकिताची सासू, विकी जैनची आई शोमध्ये आली तेव्हा त्यांनी तिला बरंच सुनावलं होतं, विकी आणि तिच्या भांडणांवरूही त्यांनी तिला ऐकवलं होतं. त्यामुळे बरेच वाद निर्माण झाले होते. विकीच्या वडिलांनी तर अंकिताच्या आईलाही फोन केल्याचं , त्यांनी शोमध्ये नमूद केलं.