Bigg Boss 17 : बिग बॉस 17 बहुचर्चित सीझन काल रात्री संपला. या शोचा भव्य ग्रँड फिनाले पार पडला, ज्यामध्ये होस्ट सलमान खानने नेहमीच्या अंदाजात विजेत्याचे नाव जाहीर केले. डोंगरीचा स्टार मुनव्वर फारूखी हा सलमान खानच्या या रिॲलिटी शोचा विजेता होण्यास यशस्वी ठरला आहे. संपूर्ण सीझनभर मुनव्वर फारूकी हा चर्चेत होता. कधी स्पर्धकांसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी झालेल्या मोठ्या भांडणांमुळे, त्याची नेहमीच चर्चा झाली. एवढंच नव्हे तर त्याच्या पर्सनल लाईफमुळेही तो बिग बॉसच्या संपू्र्ण सीझनमध्ये चर्चेत होताच.
मुनव्वर हा विजयाचा मोठा दावेदार असेल असे वर्णन सोशल मीडियावर केले जात होते. मात्र टीव्ही स्टार, अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्याशी त्याला कडवी टक्कर द्यावी लागेल, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, अंकिता असो किंवा मन्नारा चोप्रा या दोघींनाही टॉप 2 मध्ये पोहोचता आले नाही. सर्वांना आश्चर्यचकित करत, अभिनेता अभिषेक कुमारने टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. मात्र त्याला विजय मिळवत ट्रॉफीवर नाव काही कोरता आले नाही.
बिग बॉसच्या विजेत्याला काय-काय मिळालं?
नेहमीप्रमाणे बिग बॉस विजेता ठरलेल्या स्पर्धकाला, अर्थात यावेळी मुनव्वर फारुकी याला बिग बॉसची ट्रॉफी या सीझनमध्ये मिळाली आहे. मात्र, यावेळी बिग बॉसच्या विजेत्याची ट्रॉफी थोडी वेगळी आहे. याशिवाय त्याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली आहे. एवढंच नव्हे तर या वर्षी विजेता ठरलेल्या स्पर्धकाला, अर्थात मुनव्वर 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले. 15 आठवडे चाललेल्या या शोमध्ये 21 स्पर्धक होते, परंतु मुनव्वर फारुकीने सर्वांना मागे टाकले आणि ही सर्व बक्षिसे जिंकली.
15 ऑक्टोबरला सुरू झाला शो
बिग बॉसचा हा सीझन गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला होता. हा शो 107 दिवस चालला. या शोमध्ये बरीच मारामारी पाहायला मिळाली. अनेक स्पर्धकांचे वैयक्तिक आयुष्य लोकांसमोर आले.अनेक स्पर्धकांचे मन दु:खी झाले तर काहींची घरे उद्ध्वस्त झाली. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यातही बरेच वाद झाले, ते सतत चर्चेत होते. यावेळी 21 स्पर्धकांनी बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. 15 आठवडे चाललेल्या या ट्रॉफीच्या लढाईत स्पर्धक एक एक करत बाहेर पडत राहिले. पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. शेवटी ट्रॉफी मुनव्वर फारुकी याने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले.