बिग बॉस फेम Abdu Rozik ला ईडीचं समन्स, मनी लाँड्रिंग केसमध्ये होणार चौकशी, नेमकं काय झालंय ?

| Updated on: Feb 27, 2024 | 1:04 PM

प्रसिद्ध गायक आणि अभिनेता अब्दू रोझिक हे जगभरात प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस 16 मधून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्या सीझनचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक असलेला अब्दू चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. पण आता अब्दू रोझिक हा संकटात सापडला आहे.

बिग बॉस फेम Abdu Rozik ला ईडीचं समन्स, मनी लाँड्रिंग केसमध्ये होणार चौकशी, नेमकं काय झालंय ?
Follow us on

Abdu Rozik Summoned By ED : ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता अब्दू रोझिक हे जगभरात प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस 16 मधून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्या सीझनचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक असलेला अब्दू चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. पण आता हाच अब्दू  संकटात सापडला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याला 14 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. आता आज अब्दूची पुन्हा चौकशी होणार आहे.

आज ED ऑफिसमध्ये दाखल होणार अब्दू

रिपोर्ट्सनुसार, आज दुपारी अब्दू हा मुंबईतील ED च्या ऑफीसमध्ये चौकशीसाठी दाखल होणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येणारा आहे. मात्र त्याच्या वकिलांच्या सांगण्यानुसार, अब्दूला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून बोलावले आहे.

काय आहे प्रकरण ?

खरं तर, अब्दू हा गायक आणि अभिनेता तर आहेच, पण त्यासोबतच तो तो बिझनेसमनही आहे. अब्दूचे अनेक देशांमध्ये आलिशान रेस्टॉरंट आहेत. बिग बॉस 16 मधून बाहेर आल्यानंतर अब्दूने मुंबईत ‘बुर्गीर’ नावाचे आलिशान रेस्टॉरंटही उघडले. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या रेस्टॉरंटमध्ये आणखी काही कंपनीचे पैसे गुंतवले गेले आहेत. ही कंपनी ड्रग्जचा व्यवहार करते, अशी चर्चा आहे. याच प्रकरणी ईडीने अब्दूला समन्स पाठवले असून त्याची चौकशी सुरू आहे.

बिग बॉस 16 मुळे मिळालं स्टारडम

अब्दु रोजिक हा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र सलमान खानच्या बिग बॉस या शोमधून त्याला भारतात मोठी ओळख मिळाली. शोमधील अब्दूची खोडकर शैली आणि त्याचा सच्चेपणा पाहून सलमान खानही त्याचा चाहता झाला. अब्दु हा बिग बॉस 16 चा जीव होता. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अब्दूबद्दल चाहत्यांची उत्सुकता कायम आहे. यामुळेच तो प्रत्येक शोच्या निर्मात्यांची पहिली पसंती आहे. , प्रत्येक रिॲलिटी शोमध्ये त्याला पाहुणा म्हणून आमंत्रित करून टीआरपी कॅश करण्याचा प्रयत्न केला जातो.

कोट्यवधींची कमाई

एकेकाळी अब्दूने खूप गरिबी पाहिली. पण आज तो आलिशान जीवन जगतो. त्याने लहान वयातच मोठं नाव कमावलं. सध्याच्या काळात त्याचं नेटवर्थ कोट्यवधींमध्ये आहे. दुबईत त्याचं आलिशान घरही आहे. तो गायन, अभिनय, म्युझिक व्हिडीओज आणि सोशल मीडियाद्वारे तगडी कमाई करतो. त्याने फक्त भारतीयच नव्हे तर इंटरनॅशनल शो देखील केले आहेत. तो जगभरात प्रचंड पॉप्युलर आहे