बिग बॉसच्या घरातून महाराष्ट्रातील नगरकचा छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घनश्यान दरोडे घराबाहेर झाला आहे. घरातील सर्वात भांडखोर असणाऱ्या निकीच्या ग्रुपमध्ये घनश्याम खेळत होता. त्यावेळी निकी तांबोळी आणि घनश्याम चा एका संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यासोबतच निकी कायम बाईsss काय हा प्रकार असं बोलते या शब्दांवर दहीहंडीला गाणीही वाजलीत. निकी तांबोळी घरामध्ये उर्मटपणाने वागणं इतर सदस्यांचा अपमान करण्यामुळे तिची प्रतिमा डळमळीत झाली आहे. मात्र घराबाहेर आल्यावर घनश्याम दरोडो याने तिच्याबद्दल भरभरून बोलला.
बाई हा काय प्रकार हा खूप गाजला, जेवलीस का, प्रेम भेटलं, यावर टीका होतात पण माझं आणि निकीचं नातं बहिण-भावासारखा पवित्र आहे. निकी फटकळ आहे पण तेवढीच प्रेमळ पण आहे. निकी हळव्या मनाची असून महाराष्ट्राने तिची एकच बाजू बघितली आहे. घरातली भांडी घासत नाही. पण महाराष्ट्राने निकीची दुसरी बाजू पाहिली नाही. निकीने प्रत्येक वेळी माझीच काळजी घेतली आहे. मला एकच गोष्टीचा दुःख आहे मराठी प्रेक्षकांच्या मनात जागा करायला कमी पडलो, असं घनश्याम दरोडे म्हणाला.
मी घरात कधी राजकारण केलं नाही, घर घरासारखं चालवायचं होत. मी कधीही चुगली केली नाही. सुरज मला नॉमिनेट का करत होता मी त्याला कधी विचारलं नाही. सुरज माझ्या मोठा भावा सारखा आहे. ज्यावेळेस घराच्या बाहेर जाणार तेव्हाच ठरवलं होतं की माझे पॉईंट सुरजला देणार. माझ्या शब्द पाळत असतो काळा दगडावरची पांढरी रेग. घरातले लोक मला सुरजला नॉमिनेट करायला सांगत होते. सुरज गरिबीतून वर आलाय त्याला सपोर्ट केला पाहिजे. मी सुरजच्या विरोधात जाऊन कॅप्टन करू शकत नाही. माझी पहिली पसंत सुरज चव्हाणच होता. महाराष्ट्राने सुरज चव्हाण च्या पाठीशी राहायला पाहिजे मराठी माणसाला मोठा करा, असंही घनश्याम दरोडे म्हणाला.
बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्डने बॉडीबिल्डर संग्राम चौगुले याने एन्ट्री मारली आहे. आता खेळात आणखी रंगत येणार आहे. बिग बॉस घरात आता सर्वच तगडे स्पर्धक आहेत. संग्रामच्या येण्याने आता अरबाजला एक टक्कर देणारा रांगडा गडी घरात आला आहे.