बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . गेल्या 70 दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरजन करणारा बिग बॉस मराठी हा शो आता शेवटच्या टप्प्यावर आला असून लवकरच तो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या रविवारी म्हणजे 6 ऑक्टोबरला या शोचा ग्रँड फिनाले होणार असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. काल या शो मधून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना बाहेर पडावे लागले असून शो मधील सुपर 6 सापडले आहेत. मात्र ग्रँड फिनालेपूर्वी टॉप 6 पैकी आणखी एक सदस्य बाहेर पडणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शोचा होस्ट, रितेश देशमुख या कार्यक्रमातून गायब आहे. रितेशने शो सोडला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.
मात्र आता रितेश देशमुख हा भाऊचचा धक्का घेऊन परतणार आहे. त्याची शोमध्ये पुन्हा एंट्री होणार आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला असून त्यात रितेश देशमुखचा आवाज ऐकू येत आहे. या शोचा ग्रँड फिनाले, कधी आणि किती वाजता होणार आहे हे तो सांगतोय. एवढंच नव्हे तर खेळ अजून संपलेला नसून ग्रँड फिनाले पूर्वी स्पर्धकांना आणखी मोठा धक्का बसणार आहे, असंही रितेश सांगताना दिसतोय.
रितेशच्या आवाजात ग्रँड फिनालेची घोषणा
‘ चक्रव्यूह भेदून आता मिळाले आहेत या सीझनचे सुपर 6 , पण खेल अजून संपलेला नाहीये मित्रांनो.. कारण या सुपर सहांना मिळणार आहे या सीझनचा सगळ्यात मोठा धक्का! तेव्हा न चुकता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पहा 6 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजता’अशी घोषणा या प्रोमोमध्ये रितेशच्या आवाजात करण्यात आली आहे. प्रोमोच्या शेवटी तो स्टेजवर एंट्री करतानाही दिसतो. गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुख या कार्यक्रमातून होता, बरेच दिवस तो दिसला नव्हता. त्यामुळे रितेशने ग्रँड फिनालेपूर्वीच बिग बॉस हा शो सोडला की काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. पण आता या प्रोमोमुळे रितेश देशमुख पुन्हा परतल्याचे दिसत असून ग्रँड फिनालेसाठी सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.
हे आहेत सुपर 6 स्पर्धक
बिग बॉसच्या या सीझनची लोकांमध्ये मोठी क्रेझ पहायला मिळाली. अखेर या सीझनच्या अंतिम टप्प्यात शोला त्याचे सुपर 6 फायनलिस्ट मिळाले आहेत. अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरात उरले आहेत. काल वर्षा उसगांवकर बाहेर पडल्यावर अनेकांना धक्का बसला. आता हे सहा स्पर्धक शेवटच्या टप्प्यात उरले असून आजच्या एपिसोडमध्ये यांच्यापैकी आणखी एक सदस्य घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण आज बिग बॉसच्या प्रोमोमध्ये लवकरच शोला टॉप 5 सदस्य मिळणार असं दाखवण्यात आलं. त्यामुळे आणखी कोणता सदस्य घराचा निरोप घेतो आणि टॉप 5 कोण राहतात याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यांच्यापैकी एक जणच रविवारी जिंकेल आणि बिग बॉसची ट्रॉफी त्याला मिळेल.