प्रसिद्ध रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी चा सीझन नुकताच संपला, सना मकबूलने या शोचे विजेतेपद पटकावलं. तर दुसरीकडे ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझनही आता सुरू झाला असून अनेक नावंत कलाकार त्यामध्ये सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव, योगिता चव्हाण, निक्की तांबोाळी, सूरज चव्हाण असे अनेक सेलिब्रिटी यंदाच्या सीझनमध्ये दिसत आहेत. पहिल्या दिवसापासूनच ते चर्चेत असून निक्की तांबोळी ही देखील तिच्या वागण्यामुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पहिल्या आठवड्यातच तिचं वर्षा उसगांवकरांशी वाजलं आणि ती त्यांच्याशी ज्या भाषेत बोलली त्यावरून वातावरण बरंच तापलं होतं. शो चा होस्ट रितेश देशमुख यानेही तिला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर निक्की तांबोळी आता पुन्हा चर्चेत आली असून तिच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हा व्हिडीओ निक्की आणि छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडे यांचा आहे. त्यावेळी घन:श्याम लाजून लालेलाल झालेला दिसत आहे. त्याच्या या लालेलाल होण्याचं कारणही निक्की तांबोळीच आहे.
छोटा पुढारी चर्चेत
बिग बॉसमध्ये आल्यापासून छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे चर्चेत आहे. तो सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्याशी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार!असंही त्याने सगळ्यांना सांगितलं आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील सध्या दुसरा आठवडा सुरू असून या आठवड्यात छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीची चांगलीच मैत्री झालेली दिसत आहे. त्यांचाच एक व्हिडीओ आता समोर आला असून त्यामध्ये निक्की ही छोटा पुढारीला मिठी मारताना दिसली. एवढंच नव्हे तर तिच्याकडून घन:श्यामला गालावर किसही मिळालं. निक्कीकडून किस मिळताच घन:श्याम च्या चेहऱ्यावर सुंदर हसू फुललं आणि तो लालेलाल झालेला दिसला. याचा एक प्रोमोही शेअर करण्यात आला आहे.